राजवीर जाधव यांची विभागीय दौड स्पर्धेसाठी निवड

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
पुसद, 
माऊंट लिट्रा झी स्कूलचा विद्यार्थी Rajveer Jadhav राजवीर जाधव याने जिल्हा रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्याने वयोगट १४ मध्ये ६०० मिटर रनिंग (धावणे) या मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून शाळेची यशाची कायम राखली. या विद्यार्थ्यांची निवड विभागीयस्तर दौड स्पर्धेसाठी झाली आहे.
 

jadhav 
 
Rajveer Jadhav  या शाळेचे विद्यार्थी अनेक क्रीडा क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय स्तरापर्यंत सहभाग नोंदवून उज्ज्वल यश संपादन करीत आहेत. अनेक क्रीडा प्रकारांनुसार स्वतंत्र क्रीडा प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून दररोज विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचा सराव करून घेतल्या जातो. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रीडा प्रशिक्षक धुळे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक शाळेचे संस्थापक अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शाळा समन्वय, प्रशासन अधिकारी सर्व क्रीडा प्रशिक्षक, सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी केले.