आकाशातून उतरणार वैज्ञानिक उपकरणे!

राजुरा तालुक्यातील गावांमध्ये उतरण्याची शक्यता

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
राजुरा,
Scientific instruments will descend from the sky टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि केंद्र सरकारची अवकाश संशोधन संस्था इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आकाशात काही वैज्ञानिक उपकरणांचे परीक्षण करण्यासाठी एका मोठ्या आकाराच्या फुग्याद्वारे ऊंच हवेत हैद्राबाद येथील मुख्यालयातून सोडले जाणार आहे. ही उपकरणे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर जमिनीवर परत येणार असून, राजुरा तालुक्यातील काही गावांमध्ये किंवा शेत शिवारामध्ये उतरण्याची शक्यता आहे. ही मोहीम 25 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती राजुरा तहसीलदार ओमप्रकाश गौड यांनी दिली.
 
 
 
Scientific instruments will descend from the sky
 
संग्रहित फोटो  
 
या मोठ्या ‘बलून’मध्ये विशिष्ट प्रकारची वैज्ञानिक उपकरणे बसविण्यात आलेली असतील. उपकरणांचे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर ती हैदराबादपासून सुमारे 350 किमीच्या परिघात कुठेही जमिनीवर उतरू शकतात. त्यामुळे राजुरा तालुक्यातील काही गावांमध्ये व शेतशिवारातही ही उपकरणे उतरण्याची शक्यता आहे. अशी कोणतीही उपकरणे शेतात, जंगलात किंवा गावात दिसली तर तात्काळ तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तहसील कार्यालय किंवा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच, ही उपकरणे अत्यंत महत्त्वाची, मौल्यवान आणि देशाच्या वैज्ञानिक संपत्तीचा भाग असल्याने त्यांना स्पर्श करणे, हलविणे किंवा छेडछाड करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
अफवा पसरवू नये : ओमप्रकाश गौड
उपकरण आपल्या भागात उतरले तरी कुणीही घाबरू नये. अफवा न पसरविता प्रशासनास कळवावे. या उपक‘मामुळे देशाच्या वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळणार आहे. सहकार्य केल्यास संबंधित नागरिकांना या संस्थेच्या वतीने बक्षिस पण देण्यात येणार आहे. नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सहभाग आणि सतर्कता दाखवावी, असे आवाहन तहसीलदार गौड यांनी केले आहे.