नागपूर,
Srivari Brahmotsav तिरुपती बालाजी येथे पार पडलेल्या श्रीवारी ब्रह्मोत्सव या भव्य धार्मिक उत्सवात देशभरातून आलेल्या सुमारे एक लाख भाविकांनी आयुर्वेदिक उपचारांचा लाभ घेतला. या सेवेत नागपूरचे प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉ. संतोष सुर्यकांत पुसदकर (विश्वकुंभ आयुर्वेदिय चिकित्सालय) आणि डॉ. भूषण संजय आंबटकर (आरोग्यवर्धिनी चिकित्सालय) यांनी आपल्या तज्ञ टीमसह मोलाचे योगदान दिले.
भाविकांची प्रचंड गर्दी असूनही या दोन्ही डॉक्टरांनी दिवस-रात्र परिश्रम घेऊन विविध आयुर्वेदिक उपचार व आरोग्य सल्ला दिला. शरीरशुद्धी, संधिवात, अपचन, थकवा, तसेच मानसिक शांतता मिळवण्यासाठी विशेष औषधोपचार करण्यात आले.भाविकांकडून या आरोग्यसेवेचे मोठे कौतुक झाले. Srivari Brahmotsav , तिरुमला तिरुपती देवस्थान तर्फेही या उपक्रमाबद्दल विशेष धन्यवाद व्यक्त करण्यात आले.अध्यात्म आणि आरोग्य यांचा सुंदर संगम साधत नागपूरच्या डॉक्टरांनी तिरुपतीत आपला ठसा उमटवला.
सौजन्य:सारंग टोपरे,संपर्क मित्र