तेलंगाणा,
Mohammad Azharuddin हैदराबाद तेलंगाणा राज्यात काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय गप्पांमध्ये कोणत्या नेत्याला मंत्रीपद मिळणार आहे, याबाबत चर्चा रंगली होती. या गुपिताचा पर्दाफाश करत राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला असून, माजी क्रिकेटपटू आणि विधानपरिषदेचे आमदार मोहम्मद अझरुद्दीन यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे.
माहितीनुसार,Mohammad Azharuddin अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. यानंतर ११ नोव्हेंबर रोजी ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांचा मोठा वाटा असल्याने काँग्रेसने मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व मजबूत करण्यासाठी ही रणनीती अवलंबली आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.अझरुद्दीन यांना ऑगस्ट २०२५ मध्ये विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी राज्यपालांद्वारे आमदारकी स्वीकारली आहे. काँग्रेसने त्यांच्या नावापूर्वी कोडांदारम आणि अमेर अली खान यांच्या नावांची शिफारस केली होती, परंतु राज्यपालांनी ती मान्य केली नाही. त्यानंतर अझरुद्दीन यांचे नाव स्वीकारण्यात आले आणि ते आमदार म्हणून सामील झाले. आता लवकरच त्यांना मंत्री म्हणून शपथ घेतली जाणार आहे.
तेलंगाणा मंत्रिमंडळात आतापर्यंत अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व नसल्याने मुस्लीम समुदायात काही प्रमाणात असंतोष असल्याचे म्हटले जात होते. अझरुद्दीन यांचा मंत्रिपदात समावेश केल्याने या असंतोषाला तोंड देण्यासोबतच सर्व समाजाचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात सुनिश्चित केले जाणार आहे. यामुळे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री संख्या १६ वर पोहोचेल. राज्यातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यासह जास्तीत जास्त १८ मंत्री असू शकतात.मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ७ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती आणि ही त्यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ठरणार आहे. आगामी ज्युबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीत या निर्णयाचा काँग्रेसला कितपत फायदा होईल, हे राजकीय वातावरणात मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाणार आहे.