संधी मिळाली तरी भारताला प्रश्न का नाही विचारला? बांग्लादेश पत्रकारांवरच भडकला

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
ढाका, 
bangladesh-lashes-out-at-journalists बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांनी भारत दौर्‍यावरून परतलेल्या बांगलादेशी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची नाराजी यासाठी आहे की या पत्रकारांनी भारताला बांगलादेशातील निवडणुकांमध्ये भारतीय हस्तक्षेपाबाबत  कोणताही प्रश्न विचारला नाही. हुसेन म्हणाले की, “गेल्या १५ वर्षांत झालेल्या निवडणुकांबद्दल भारताला कोणीही प्रश्न विचारला नाही. भारत नेहमी म्हणतो की त्याला शेजारी देशांमध्ये निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत, पण मग त्याबाबत प्रश्न विचारण्याची हिम्मत कुणी दाखवली नाही.”
 
bangladesh-lashes-out-at-journalists
 
माध्यमांच्या माहितीनुसार, एका पत्रकाराने हुसेन यांना सांगितले की बांगलादेश डिप्लोमॅटिक कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशन (DCAB) चे एक प्रतिनिधीमंडळ अलीकडेच भारतात गेले होते. या भेटीत भारतीय परराष्ट्र सचिवांनी त्या प्रतिनिधींना सांगितले होते की भारत शेख हसीनाच्या परताव्यासंदर्भातील कायदेशीर बाबींची तपासणी करत आहे. जेव्हा हुसेन यांना विचारले गेले की भारताने यासंदर्भात काही अधिकृत माहिती दिली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “आम्ही आमच्या कायदेशीर जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार शेख हसीनाच्या परताव्याची विनंती करण्यात आली आहे. bangladesh-lashes-out-at-journalists भारत आपली कायदेशीर तपासणी करत आहे आणि त्यांनी अजून उत्तर दिलेले नाही, पण ते स्वतःहून या विषयाकडे लक्ष देत आहेत.” हुसेन पुढे म्हणाले, “भारत भेटीदरम्यान तुम्हाला एक संधी मिळाली होती. भारतीय परराष्ट्र सचिवांनी तुम्हाला थेट प्रश्न विचारण्याची मुभा दिली, पण तरीसुद्धा तुम्ही कुणीही तो प्रश्न विचारलाच नाही. त्यांनी म्हटले की भारताला समावेशक आणि पारदर्शक निवडणुका हव्या आहेत. मग तुम्ही विचारायला हवे होते की मागील १५ वर्षांत भारताने हेच का सांगितले नाही? मागील निवडणुका याच सूत्राने घेतल्या होत्या का?"?”
ते पुढे म्हणाले, “तुमच्यापैकी बरेच जण वरिष्ठ पत्रकार आहेत, पण जेव्हा तुम्हाला संधी मिळाली तेव्हा तुम्ही मौन बाळगले. bangladesh-lashes-out-at-journalists मला हे पाहून खूप आश्चर्य वाटले.” गेल्या आठवड्यात हुसेन यांनी भारतासोबतच्या १० द्विपक्षीय करार रद्द झाल्याच्या बातम्या फेटाळल्या होत्या. त्यांनी सांगितले की, “मागील सरकारच्या काळात झालेल्या केवळ एका कराराला टगबोट खरेदी कराराला रद्द करण्यात आले आहे.” सरकारी वृत्तसंस्था बीएसएस च्या माहितीनुसार, हा निर्णय दोन्ही देशांच्या परस्पर सहमतीने घेण्यात आला, कारण या प्रकल्पाचे मूल्यमापन केल्यानंतर तो बांगलादेशसाठी फायदेशीर नसल्याचे आढळले.
हुसेन यांनी पुढे सांगितले की, बांगलादेश सरकार सध्या अदानी समूहासोबतच्या वीज खरेदी कराराचा आणि भारताच्या कर्ज सुविधेवर आधारित काही प्रकल्पांचा पुनरावलोकन करत आहे. हुसेन यांची ही टिप्पणी त्या पार्श्वभूमीवर आली आहे की, स्थानिक प्रशासकीय सल्लागार आसिफ महमूद शोएब भुईयान यांनी त्यांच्या सत्यापित फेसबुक खात्यावर दावा केला होता की अंतरिम सरकारने शेख हसीनाच्या कार्यकाळातील भारतासोबतचे १० करार रद्द केले आहेत.