अॅरिझोना,
Theft at Mon Cherie Cafe चोरीसाठी आलेले चोर रोमान्समध्ये हरवले असल्याचे ऐकूनच कोणी विश्वास ठेवणार नाही, पण अमेरिकेतील अॅरिझोना राज्यात घडलेल्या एका विचित्र घटनेने सर्वांना थक्क केले आहे. "मोन चेरी" नावाच्या एका प्रसिद्ध कॅफेमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या जोडप्याने प्रथम सार्वजनिक ठिकाणीच शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर पैसे व वस्तू लंपास केल्या. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, फुटेज समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
हुडी घातलेला एक पुरूष आणि त्याच्यासोबत एक महिला "मोन चेरी" कॅफेमध्ये जबरदस्तीने प्रवेश करताना दिसले. हे कॅफे आपल्या गुलाबाच्या सजावटीसाठी आणि रोमँटिक वातावरणासाठी ओळखले जाते. कॅफेमध्ये घुसल्यानंतर दोघे थेट फुलांनी सजवलेल्या कोपऱ्यात गेले आणि चोरी करण्याआधीच त्यांनी उघडपणे शारीरिक संबंध ठेवले. यानंतर त्या जोडप्याने कॅफेच्या आत प्रवेश करून रोकड आणि इतर वस्तू चोरल्या.
सीसीटीव्ही फुटेजनुसार त्यांनी अंदाजे ४५० डॉलर्स, एक आयफोन आणि रमची बाटली चोरी केली. तसेच त्यांनी कॅफेचे दोन दरवाजे तोडून आत प्रवेश केला होता. चोरीदरम्यान दोघांनी चेहऱ्यावर मास्क घातले होते, पण नंतर त्यांनी ते काढले, ज्यामुळे त्यांचे चेहरे स्पष्टपणे कॅमेऱ्यात दिसून आले. पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला असून ते अद्याप फरार आहेत. कॅफेच्या मालकीण लेक्सी कॅलिस्कन यांनी सांगितले की सकाळी कॅफेमध्ये आल्यावर तिला चोरी आणि तोडफोड झाल्याचे आढळले. “संपूर्ण काउंटर तुटलेला होता, सर्व वस्तू अस्ताव्यस्त होत्या. ही घटना पाहून आम्ही सगळेच थक्क झालो. चोरीपेक्षा जास्त धक्कादायक म्हणजे त्यांनी आमच्या कॅफेला अशा प्रकारे वापरले, असे त्या म्हणाल्या.