ढगाळी वातावरण; अवकाळी पावसाने खरीपासह रब्बीतील पिकेही धोक्यात

सोयाबीन हातचे गेले, कपाशी, तुरीलाही फटका

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
वर्धा,
wardha crop damage दिवाळीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने सोयाबीन भिजून कोंब फुटले व कापूस ओला झाला. तर आता गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. अद्यापही निम्म्या शेतकर्‍यांचे सोयाबीन काढायचे आहे. कापूस ओला झाला असून शेतीची कामे ठप्प पडली आहे.
 
 

wardha crop damage 
यंदा पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले आहे. संततचा पाऊस, सोयाबीनवर आलेले येलो मोझॅकचा अटॅक यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे नगदी पीक सोयाबीन हातचे गेले. उरले-सुरले पीक अवकाळी पावसाने हिरावले. अनेक शेतकर्‍यांनी उभ्या पिकात जनावरे सोडले, काहींनी सवंगणी केलेले पीक जाळून टाकले. शेतकर्‍यांचा काढणीचा खर्चसुद्धा निघाला नाही. यामुळे ही आर्थिक तूट कशी भरुन काढावी, कर्जाची परतफेड कशी करावी, रब्बी हंगामाचे नियोजन, कुटुंबाचा खर्च कसा करावा या विवंचनेत शेतकरी आहेत.
दिवाळीपासून wardha crop damage  अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनचे भिजले तर कापूस ओला झाला. परिणामी, शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले तर. आता ढगाळ वातावरणाचा परिणाम तूर पिकांवर झाला आहे. तूर पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. बचावासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत असले तरी ढगाळ वातावरण खुलतपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामाची शेतीची मशागतसुद्धा ठप्प पडली आहे. ग्रामीण भागात मजुरांच्या हातालासुद्धा काम नाही. ऑटोबर महिना संपत असून थंडी गायबच आहे. अशीच परिस्थिती काही दिवस राहिल्यास रब्बी हंगामातील पिके होतील की, नाही अशी भीती शेतकर्‍यांमध्ये आहे.