जिल्ह्यातील २० मंडळांचा नव्याने अतिवृष्टीग्रस्तांमध्ये समावेश : ना. डॉ. भोयर

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
वर्धा,
Dr. Pankaj Bhoyar सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने भरीव तरतूद केली आहे. मात्र, जिल्ह्यात काही मंडळांचा नुकसान भरपाईत समावेश नसल्याचे लक्षात आल्यानंतर शासनकडे पाठपुरावा करून या मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे. या संदर्भात आज बुधवारी शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे आता वंचित असलेल्या २० मंडळातील शेतकर्‍यांना मदत मिळेल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
 

Dr. Pankaj Bhoyar  
सप्टेंबर महिन्यात Dr. Pankaj Bhoyar  जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेत जमीन खरडून गेली होती. पावसामुळे शेत पिकांचे नुकसान झाले होते. पूर व सततच्या पावसामुळे घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू झाला होता. शासनाने तातडीने पावले उचलत मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्यात जिल्ह्यातील काही मंडळाचा समावेश सुटला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाला वंचित असलेल्या मंडळ परिसरातील शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने सर्व्हे करून २० रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून जिल्ह्यातील सुटलेल्या वीस मंडळाचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने वंचित असलेल्या २० मंडळाचा समावेश केला आहे. २० मंडळातील ७२ हजार २६० शेतकर्‍यांचा नव्याने समावेश करण्यात आला असून बाधित क्षेत्र ८९ हजार ९७३.३९ हेटर आहे. त्यासाठी ७६५६.८६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. २० मंडळाचा समावेश झाल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे, असेही पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.