वाशीम,
Shri Vasudev Ashram Abhyasika : येथील श्री वासुदेव आश्रम अभ्यासिकेत श्री कूष्मांड नवमी महोत्सव गुरूवार ३० ते शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे.
या कार्यक्रमात श्री दत्तसंप्रदायवर्धक प.पू.श्री सद्गुरू विजयकाका पोफळी महाराज उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमात ३० रोजी सकाळी ७.०० पीठस्थापना,सकाळी ९.०० वाजता भावपूजन प्रारंभ,दुपारी १२ वाजता आरती आणि महाप्रसाद होणार आहे.
सायंकाळी ६.०० वाजता त्रिपदी सायंप्रार्थना.सायंकाळी ७.०० वाजता तबला व संतूर यांची जुगलबंदीचा शानदार कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वाजता श्री दत्तयाग प्रारंभ,सकाळी ९.०० वाजता संकेश्वर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या शुभहस्ते ‘पत्र प्रबोध’ या पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे.यावेळी महाजनको कंपनीचे संचालक तथा भाजपाचे राज्य प्रवक्ते विश्वास पाठक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.दुपारी १२.०० वाजता दत्तयाग पूर्णाहुती झाल्यावर आरती आणि महाप्रसाद होणार आहे.