नवी दिल्ली,
viral-video सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ खरोखरच भयानक आहेत. काही व्हिडिओ गंभीर धडा देखील शिकवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एका तरुणीला घराबाहेर कपडे वाळवताना विजेचा धक्का बसला आहे. ही घटना घरासमोरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. लोक आता या व्हिडिओकडे इशारा म्हणून पाहत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की एक तरुणी आपल्या घरातून कपडे वाळत घालण्यासाठी बाहेर येते. ती पूर्णपणे ठणठणीत दिसते. ती एकामागून एक कपडे दोरीवर टांगत असताना तिचा हात अचानक त्या दोरीला लागतो, जी जवळच्या वीजेच्या खांबाला बांधलेली असते. क्षणातच तिला जबरदस्त विजेचा धक्का बसतो आणि ती किंचाळते. किंचाळण्याआधीच तिचं शरीर आकडतं आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळते. viral-video व्हिडिओमध्ये आणखी एक मुलगी त्या ठिकाणाहून जाताना दिसते. ती मुलगी जमिनीवर पडलेल्या तरुणीला पाहून घाबरते आणि मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना आवाज देते.
सौजन्य : सोशल मीडिया