नागपूर,
jaripatka-accident जरीपटका परिसरात भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या दुचाकीमुळे झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता, यश महादेव भूते (वय २५, रा. समता नगर, प्लॉट क्र. १००, जरीपटका) हा आपली होन्डा शाईन ही दुचाकी चालवत भाजीपाला घेवून घरी परतत होता. तेव्हा खोब्रागडे चौकाजवळील एम.एच.के.एस टायर शोरूमसमोर, एका हिरो स्प्लेंडर या दुचाकी चालकाने आपल्या ताब्यातील वाहनाला भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत यशच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत यश भूते गंभीर जखमी झाला. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ मदत करून जखमीला अपेक्स हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांकडून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. jaripatka-accident या घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. फिर्यादी अशुतोष महादेव भूते (वय २७, रा. समता नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध कलम २८१, १२५(अ), १२५(ब) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.