युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी बैठक उत्साहात

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
यवतमाळ, 
जिल्ह्याचे नेते माजी मंत्री मदन येरावार यांच्या सूचनेनुसार यवतमाळ येथे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, जिल्हा राजू पडगिलवार व जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत Yuva Morcha District Executive Committee युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता यांच्या नेतृत्वात भाजपा युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले.
 
 
y29Oct-Baithak
 
त्याचप्रमाणे विद्यार्थी जिल्हा सहसंयोजकपदी नयन गुप्ता, जिल्हा सचिवपदी राजेश पांडे, अविनाश चावरे, श्रेयस हरणे, वागडकर, युवा मोर्चा बोरी मंडळ अध्यक्षपदी अक्षय जाधव, वणी चिखलगाव मंडळ अध्यक्षपदी नागेश यांची तसेच जिल्हा कोषाध्यक्षपदी आसिफ बुधवानी आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी गौरव ठाकरे, मिलिंद शिंदे, अजय नेमाडे, धीरज गेडाम, मंगेश चवरे, अमोल भेदुरकर, उत्तम जाधव, ज्ञानदीप पवार, धीरज काळे यांची नियुक्ती करण्यात आली.
 
 
त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पक्षाची शिस्त पाळून पक्षाचे ध्येयधोरण तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवून त्यांना अधिक सकि‘य करण्याकरिता व भाजपा पक्षाला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
 
 
Yuva Morcha District Executive Committee युवा मोर्चा जिल्हा पदाधिकार्‍यांपैकी यवतमाळ विधानसभा सूरज जैन, वणी विधानसभा परिक्षित आडे, राळेगाव विधानसभा निलय घिनमिने, आर्णी विशाल कदम यांना विधानसभा प्रभारी म्हणून, तसेच यवतमाळ विधानसभा रोहन यादव, वणी विधानसभा प्रज्वल ठेंगणे, राळेगाव विधानसभा रूपेश राऊत, आर्णी विधानसभा चेतन जाधव यांना प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. तसेच इतर जिल्हा पदाधिकारी यांना मंडळ प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी बैठकीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.