झुबीन गर्ग मृत्युप्रकरणी मोठी कारवाई गीतकार व महिला गायिकेसह चौघांना अटक

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
गुवाहाटी,
Zubin Garg death case ईशान्य भारतातील लोकप्रिय गायक झुबीन गर्ग यांच्या गूढ मृत्युप्रकरणी चौकशीदरम्यान मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी पोलिसांनी झुबीनचे जवळचे सहकारी संगीतकार शंखज्योती गोस्वामी आणि महिला गायिका अमृतप्रभा महंत यांना अटक केली. घटनेच्या वेळी हे दोघेही घटनास्थळी उपस्थित असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की चौकशीत त्यांच्या विरोधात काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्यामुळे अटक अपरिहार्य ठरली.
 
 
Zubin Garg death case
 
या आधीच झुबीनचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आणि ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानु महंत यांना ताब्यात घेण्यात आले होते. या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आला आहे. आसाम पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष महासंचालक मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी सांगितले की, न्यायालयाने महंत आणि शर्मा यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील गंभीरतेमुळे एफआयआरमध्ये सीआयडीने कलम १०३ देखील जोडले असून, हे कलम थेट हत्येच्या शिक्षेशी संबंधित आहे.
 
गायक झुबीन गर्ग यांचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये समुद्रात पोहताना गूढ परिस्थितीत मृत्यू झाला होता. ते श्यामकानु महंत यांच्या कंपनीतर्फे आयोजित चौथ्या ईशान्य भारत महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले होते. महंत यांच्याविरुद्ध राज्यात आधीच साठहून अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत, Zubin Garg death case तर गर्गचे मॅनेजर शर्मासह इतर दहा जणांविरुद्ध देखील एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणांनी झुबीनचे चुलत भाऊ आणि पोलिस उपअधीक्षक संदीपन गर्ग यांच्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे. मात्र तपासाधीन प्रकरण असल्याने अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. झुबीन गर्ग यांच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली असून, अटकेच्या या मालिकेमुळे चौकशीला नवे वळण मिळाले आहे.