ना. अँड. आकाश फुंडकर यांनी केले महामानवांना अभिवादन

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
खामगाव,
akash fundkar राज्याचे कामगार मंत्री ना. अँड आकाश फुंडकर यांनी 2 ऑक्टोबर रोजी भाजपा कार्यालयात महामानवांना अभिवादन केले. भाजपाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला. या अंतर्गत विविध समाज उपयोगी कार्यक्रम पार पडले.
 
 

fundakar  
 
 
या पंधरवड्याचा समारोप काल 2 ऑक्टोबर रोजी महामानवांना अभिवादन करून करण्यात आला. जयंतीनिमित्त महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेचे पूजन सर्वप्रथम ना अँड आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच विजयादशमी दसरा निमित्ताने प्रभू श्रीराम व धम्मचक्र दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.akash fundkar यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित,जिल्हा चिटणीस संजय शिंनगारे, शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार, डॉ एकनाथ पाटील,सत्यनारायण थानवी, गणेश जाधव,अशोक हट्टेल, सौ अनिता देशपांडे, माजी नगरसेविका सौ शिवानी कुलकर्णी, सौ भाग्यश्री मानकर, सौ जानवी कुलकर्णी, पवन गरड,शिवा आनंदे शेखर कुलकर्णी, रवी गायगोळ, नंदू कांडेकर, मयूर घाडगे,रुपेश शर्मा,जसवंतसिंग शिख, अँड मंदिपसिंग शिख,विक्की चौधरी, हर्ष शर्मा,राम दायमा,आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व महामानवांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.