नागपूर,
Alabhya Pachkhede साेमलवार हायस्कूल आणि ज्युनियर काॅलेज निकालस शाखेची दहावीची विद्यार्थिनी अलभ्या पाचखेडे हिची विभागीय स्तरावरील आंतरशालेय राेप मल्लखांब स्पर्धेत निवड झाली आहे. ती 19 वर्षांखालील मुलींच्या गटात नागपूर शहराचे प्रतिनिधित्व करणार आहे. नागपूर येथे झालेल्या शहर पातळीवरील स्पर्धेत अलभ्याने दुसरे स्थान मिळवून विभागीय स्तरावर निवड निश्चित केली. जिल्हा क्रीडा कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने आयाेजित विभागीय स्पर्धा 7 ऑक्टाेबर 2025 राेजी आनंद निकेतन विद्यालय वराेरा येथे हाेणार आहे. संस्थेचे सचिव प्रकाश साेमलवार, प्राचार्य दामाेदर ठाेंबरे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अलभ्याचे अभिनंदन केले.