म. गांधींनी लिहिले मुर्‍हा देवी विश्वस्तांना पत्र

हरिजनांना मंदिरात प्रवेश दिल्याचे कौतुक

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
अंजनगाव सुर्जी,
mahatma-gandhi : देशात हरिजनांसाठी मंदिर खुली करावी यासाठी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान देशातील ग्रामीण भागातील सर्वात पहिले हरिजनांसाठी खुले झालेले मंदिर हे मुर्‍हा देवीचे असल्याची माहिती मुर्हा देवी संस्था संस्थाचे विश्वस्त रमेश पांडे गुरुजी व साहेबराव पखान यांनी दिली.
 
 
 
KL
 
 
 
//महात्मा गांधींनी मानले आभार
 
 
हरिजनांसाठी देशातील सर्व मंदिरे खुली करण्यासाठी महात्मा गांधी यांनी चळवळ सुरू केली होती. त्या चळवळीत मुर्‍हा मंदिर संस्थांनने सहभाग घ्यावा असे पत्र महात्मा गांधी यांनी दिले होते. त्यांच्या पत्राला प्रतिसाद देत त्याकाळी असणार्‍या मंदिर संस्थांच्या विश्वस्तांनी हे मंदिर हरिजनांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला होता. देशातील पहिले सार्वजनिक न्यास म्हणून मुर्‍हा देवी मंदिर हे हरिजनांसाठी खुले झाले. स्वतः महात्मा गांधींनी मुर्‍हा देवी येथे येण्याची तयारी दर्शवली होती. ते अंजनगाव सुर्जी पर्यंत पोहोचले देखील होते. मात्र काही कारणास्तव त्यांना अंजनगाव सुर्जी येथून परतावे लागले. त्यावेळी महात्मा गांधी यांनी २९ डिसेंबर १९३३ रोजी अंजनगाव सुर्जी येथून मुर्‍हा देवी मंदिर संस्थानला पत्र लिहिले होते. या पत्रात मी मंदिरात येऊ शकलो नाही, याची खंत व्यक्त करीत हरिजनांना मंदिरात प्रवेश दिल्याने मी विश्वस्तांचे आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो असा उल्लेख विश्वस्तांना पाठवलेल्या पत्रात आहे. हे पत्र आजही मंदिरांच्या विश्वस्तांनकडे असून या पत्राची भव्य प्रत मंदिर परिसरात देखील लावण्यात आली आहे. महात्मा गांधीजींच्या या पत्राची आठवण त्यांच्या पत्ररूपाने आजही मुर्‍हा देवी मंदिराच्या विश्वस्तांनी जपून ठेवली आहे.