लाव्हा इस्टेटमध्ये धम्मचक्र दिन व गांधी जयंती साजरी

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Bakutai Nagar Nagpur लाव्हा-७ सोसायटी, बकुताई नगर येथील दुर्गा महिला उत्सव मंडळा तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन व गांधी जयंती संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. भगवान गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
baku
 
 
या वेळी महिला मंडळातील सदस्यांनी गीत सादर करून महामानवांना अभिवादन केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.Bakutai Nagar Nagpur कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा कावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पल्लवी नागदेवे यांनी मानले. लाव्हा-७ इस्टेट सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
सौजन्य:रमेश मेहर,संपर्क मित्र