कृषी अधिकारी सूर्यवंशी लाच घेताना पकडला

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
हदगाव, 
तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयातील कृषी विस्तार अधिकारी Balasaheb Suryavanshi बाळासाहेब पुंडलिक सूर्यवंशी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना व विशेष घटक योजनेचा अतिरिक्त पदभार सांभाळत होता. बुधवार, १ ऑक्टोबरला २० हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या योजनेतील लाभार्थ्यांकडून आर्थिक तडजोड केल्याशिवाय बिले न काढणे, कामे अडवून ठेवणे, तसेच बेकायदेशीर पैशाची मागणी करणे अशा गंभीर तक्रारी या सूर्यवंशीच्या विरोधात सातत्याने होत होत्या.
 
 
Balasaheb Suryavanshi
 
मनाठा येथील एका शेतकर्‍याकडून सूर्यवंशीने २० हजार रुपयांची लाच मागितल्याने त्याने नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार विभागाने शहानिशा करून बुधवार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते २ च्या सुमारास नांदेड येथील चैतन्यनगर परिसरातील नंदी हॉटेलमध्ये सापळा रचला. या कारवाईत सूर्यवंशी २० हजार रुपये घेताला पकडला गेला. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात कलम ७ अंतर्गत दाखल करण्यात आला. बाळासाहेब सूर्यवंशी याच्याकडून रोख, मोबाईल फोन, आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त करण्यात आले असून त्याच्या घराची झडती सुरू आहे.
 
Balasaheb Suryavanshi  या अधिकार्‍याने आदिवासी व दुर्गम भागातील शेतकर्‍यांनाही नाहक पैशासाठी त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागतात असे कारण देऊन त्याने लाभार्थ्यांची बिले थांबवली होती. ४ लाख विहिरीच्या कामासाठी ५० हजारांची त्याने मागणी केल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. या कारवाईत प्रेक्षण अधिकारी प्रशांत पवार उपस्थित होते. पुढील तपास रसूल तांबोळी करीत आहेत. या घटनेनंतर हदगाव तालुक्यातील शेतकरी बांधव व लाभार्थ्यांनी असा भ्रष्ट अधिकारी पकडला गेल्याबद्दल समाधान आनंद व्यक्त केला आहे.