बुद्धिबळपटू दिव्या देशमुखच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
पुसद, 
मूळचा पुसदचा रहिवासी व नागपूरच्या रेशीमबाग क्रिकेट कर्णधार केदार कैलास जगताप याने संघाचा उपविजेतेपदाचा सन्मान महिला बुद्धीबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय बुद्धिबळपटू Divya Deshmukh दिव्या देशमुखच्या हस्ते व्हीसीए नागपूर येथे सोमवार, २९ सप्टेंबरला स्वीकारला.
 
 
divya
 
Divya Deshmukh  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दिव्या देशमुखसह विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे मुख्य पदाधिकारी प्रशांत वैद्य, सचिव संजय बडकस, सहसचिव गौतम काळे, अजुर्र्न पाठक, गोखले, सदस्य अ‍ॅड. देशपांडे, समीर गुजर व चंद्रकांत मानकेंसह भारतीय माजी क्रिकेटपटू तथा विदर्भ कोच वसीम जाफर उपस्थित होते. बीसीसीआय व व्हीसीए अंतर्गत २०२४-२५ मध्ये पार पडलेल्या विविध सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना व विजेत्या, उपउपविजेत्या संघांना वार्षिक बक्षीस वितरण समारंभात सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. केदार कैलास जगताप यांच्या नेतृत्वात रेशीमबाग जिमखाना संघ डॉ. दोईराजन चषकात उपविजेता ठरला होता.