कारंजात दुर्गा विसर्जन मिरवणुक शांततेत

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
washim news यंदा २२ सप्टेंबर ते ३ ऑटोबर या दरम्यान नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला असून, कारंजा येथे ३ ऑटोबरला मॉ दूर्गेला निरोप देण्यात आला. त्या अनुषंगाने विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यंदा कारंजा शहरात ३५ सार्वजनिक नवदुर्गा मंडळाकडून दुर्गेची स्थापना करण्यात आली. परंतु विसर्जन मिरवणुकीत यातील २५ सार्वजनिक मंडळ सहभागी झाले होते. कारंजा मानोरा मार्गावरील अडाण नदीपात्रात, तुळजापूर येथील धरणात व कारंजा धनज मार्गावरील ड्रीमलँड सिटीतील विहिरीत अशा तीन ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती.
 
 

washim 
 
 
विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी आणि शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिनेशचंद्र शुला यांच्या उपस्थितीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. यात पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड, आरसीपी पथकाचे जवान, एसआरपीएफ जवान आणि सीआरपीएफ जवानांचा समावेश होता. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन ड्रोन च्या वतीने पोलिसांकडून विसर्जन मिरवणुकीवर करडी नजर ठेवण्यात आली.washim news तर स्थानिक पालिका प्रशासनाचे व महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. मिरवणुकी दरम्यान सहभागी नागरिकांसाठी काही सामाजिक संघटनांकडून ठिकठिकाणी थंड पाणी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.
  
विसर्जन मिरवणुकीत डीजेंची चढाओढ
यंदाच्या दुर्गा विसर्जन मिरवणुकीत डीजेंची चढाओढ दिसून आली. एकापेक्षा एक सरस डिजे मिरवणुकीत असल्याने केवळ कर्णकर्कश आवाज असल्याचे जाणवले. काही डिजे वाहनावर युवक चढून दुसर्‍या डीजेवल्यांना डिवचत होते. अशा परिस्थितीत प्रशासन आणि सर्वसामान्य मात्र हतबल दिसत होते.