खामगाव अग्निशमन दल अत्याधुनिक यंत्रणानी सज्ज!

फायर बुलेट, क्विक रिस्पॉन्स व्हेईकल व सहा हजार लिटर क्षमतेचे नवे अग्निशमन बंब ताफ्यात दाखल

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
खामगाव,
fire safety khamgaon खामगाव-येथील नगर पालीकेच्या अग्निशमन विभागात अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून काल दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन फायर बुलेट, एक क्विक रिस्पॉन्स व्हेईकल व एक सहा हजार लिटर क्षमतेच्या नव्या अग्निशमन बंबाचे ना. अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या अत्याधुनिक वाहनांमुळे खामगाव अग्निशमन दल अधिक प्रभावी झाले असून शहर परिसरात कोणत्याही प्रकारची आग लागल्यास त्यावर त्वरीत नियंत्रण मिळविणे यामुळे सोपे झाले आहे.
 

fire safety khamgaon 
राज्याचे कामगारमंत्री तथा खामगावचे आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नांनी खामगावनगर पालीकेचा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून दोन फायर बुलेट व एक क्विक रिस्पॉन्स व्हेईकल वार्षिक योजनेअंतर्गत दोन अत्याधुनिक अग्निशमन बंब खामगाव नगर पालिकेकरीता मंजूर झालेले आहेत. यातील सहा हजार लिटर क्षमतेचे नवी अग्निशमन गाडी नगर पालिकेला प्राप्त झाली आहे. या सर्व वाहनांचे काल ना. अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, संजय शिनगारे यांच्यासह नगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ना. फुंडकर यांनी स्वतः क्विक रिस्पॉन्स व्हेईकल चालवून बघतली. या अत्याधुनिक वाह्मांमुळे खामगाव अग्निशमन विभाग अधिक स्मार्ट बनला असून सर्व प्रकारच्या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी ठरणार आहे. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर झालेले दुसरे अग्निशमन वाहन दिवाळीनंतर खामगाव अग्रिशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती नगर पालीका अग्निशमन विभागाचे रोठे यांनी सांगितले आहे.