नागपूर,
First City area पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज फर्स्ट सिटी परिसराला भेट दिली. यावेळी अध्यक्ष शौर्य सीलोदिया यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यानंतर हेमंत अंबासेलकर यांनी मिहानमधील विविध समस्यांबाबत निवेदन सादर केले. यात MADC सोबत बैठक, घनकचऱ्याची व्यवस्था, बसस्टॉपची सुविधा, जन्म-मृत्यू नोंदणी तसेच मिहानमधील 5000 रहिवाशांच्या अडचणी यांचा समावेश होता.
पालकमंत्री बावनकुळे यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. First City areaया प्रसंगी खापरचे माजी सरपंच सोनटक्के यांची विशेष उपस्थिती होती.
सौजन्य :हेमंत अंबासेलकर,संपर्क मित्र