अभय दर्भे
आर्वी,
ganorkar couple महात्मा गांधी यांचे ‘माझी आत्मकथा’ हे पुस्तक वाचल्यापासून त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण झाले. त्यांनी दिलेल्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न अमरावती येथील वृद्ध गणोरकर दाम्पत्याने सुरू केला आहे. गेल्या ३० वर्षात त्यांनी गांधींच्या वाटेवर चालताना अनेक गोष्टी महात्मा गांधींप्रमाणेच वर्ज्य केल्या आहेत. कोरोनापुर्वी अमरावतीहून हे दाम्पत्य सेवाग्राम येथे २ ऑटोबरला पोहोचत होते. आता त्यांनी सायकल सोडली असली तरी ते वाटेल तेव्हा आश्रमात पोहोचतात आणि आत्मशांती मिळेपर्यंत ते आश्रमात असतात. २ ऑटोबर रोजी अमरावतीहून सेवाग्राम येथे जाताना येथील अॅड. शोभा काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिल्यानंतर या गांधीमय जीवन जगणार्या संजय व संजीवनी गणोरकर दाम्पत्यांनी आपला प्रवास उलगडला.
गणोरकर दाम्पत्य पुढे म्हणाले की, टाईम या जगप्रसिद्ध मासिकाने गांधीजींवर या शतकातील श्रेष्ठ पुरुष नावाने अंक काढला होता. तो वाचल्यानंतर आपल्या घरापासून केवळ ११० किमी असलेल्या सेवाग्राम येथे जाण्याची प्रेरणा मिळाली. जवळजवळ ३०-३२ वर्षांपूर्वी आपण सेवाग्राम आश्रम व बापूकुटीला भेट दिली आणि गांधीजींच्या व बापूकुटीच्या प्रेमात पडलो. त्यावर्षीपासून दरवर्षी २ ऑटोबरला जाऊन त्यांना आदरांजली देण्याचा संकल्प केला. ३०-३२ वर्षे आपण उभयता सेवाग्राम आश्रमाला एक व दोन ऑटोबरला सायकलने अमरावतीवरून येत होतो. आता महात्मा गांधींच्या विचाराचा व व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने फत २ ऑटोंबरच नव्हे तर ३० जानेवारी, कस्तुरबा जयंती व आश्रमाची आठवण झाली तरीही आम्ही आश्रमात पोहोचतो. गेली अनेक वर्षे सातत्याने आश्रमात आल्यामुळे आश्रमवासींसोबत कौटुंबिक स्नेहबंध जुळले.ganorkar couple गांधीजींनी दिलेल्या व त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणे किंवा त्यांचे विचार आत्मसात करून अमलात आणणे फार कठीण! जवळजवळ सामान्य माणसाला अशय आहे. त्यामुळे याबाबतीत आपल्याला काय करता येईल याचा विचार करताना आपण दरवर्षी २ ऑटोबर रोजी बापूकुटीत प्रार्थना करून मनाशी व्रत निश्चय करून एक वर्षभर त्याचे पालन करायचे, असे ठरवले. त्याची सुरुवात आपण वर्षभर अनवाणी चालण्याने केली होती. पुढे पुढे दरवर्षी वेगवेगळे व्रतं घेऊन आपल्या परीने मनाचा संयम पाळण्याचे ठरवले. या व्रतांमध्ये वर्षभर मीठ न खाणे, गोड पदार्थ न खाणे, तेल व तूप न खाणे, केवळ पांढरे पदार्थच खाणे, केस न कापणे, सायकल चालवणे, दररोज एका व्यक्तीस पत्र लिहून ते पोस्ट करणे, आदी अनेक व्रतं निश्चयाने पूर्ण केली. बापूकुटी, बा कूटी, आखरी निवास या संपूर्ण परिसरात फिरताना आपल्या मनाला विलक्षण शांती प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले.