मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
मुंबई,
govinda sunita relationship बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते गोविंदा आणि त्यांच्या पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही वर्षांपासून विविध चर्चा रंगत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा, कुटुंबातील मतभेद आणि अलीकडेच एका मराठी अभिनेत्रीशी गोविंदाच्या कथित अफेअरची चर्चा यामुळे हे जोडपे सतत प्रकाशझोतात राहिले आहे. आता या साऱ्या अफवांवर सुनीता आहुजांनी प्रथमच खुलं वक्तव्य केलं आहे.
 

govinda sunita relationship 
अलीकडेच अभिनेत्री आणि व्लॉगर संभावना सेठ यांच्या व्लॉगमध्ये सुनीता आहुजा यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी गोविंदाच्या कथित अफेअर, कुटुंबातील तणाव, आणि त्यांच्या वैवाहिक नात्याच्या स्थितीवर भाष्य केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, जर गोविंदाने कधीही खोटं वागले असते, तर त्या स्वतः माध्यमांसमोर येऊन सत्य मांडणाऱ्या पहिल्या व्यक्ती असत्या.
 
 
सुनीता म्हणाल्या, “अडथळे निर्माण करणाऱ्या काही लोकांमुळे आमच्या वैवाहिक जीवनात त्रास झाला. दुर्दैवाने काही कुटुंबीयच आमचं सुख पाहू शकत नाहीत. मी आणि गोविंदा गेल्या 15 वर्षांपासून वेगळ्या घरात राहत आहोत, पण तरीही तो घरी येतो, कुटुंबाशी संपर्क ठेवतो.”गोविंदावर अजूनही प्रेम असल्याचं सांगताना सुनीता म्हणाल्या, “जो चांगल्या स्त्रीला दुःख देईल, तो कधीही सुखी राहू शकत नाही. मी त्याला माझं संपूर्ण आयुष्य दिलं आहे. आजही त्याच्यावर प्रेम करते. नक्कीच मी नाराज आहे, पण माझ्या मुलांमुळे मी खंबीर राहू शकले.”त्यांनी हेही सांगितलं की, काही अफवांमुळे त्यांच्या मुलांनाही विचारणा झाली आणि त्यामुळे त्या अधिक त्रस्त झाल्या. “आज माझे मित्र नाहीत, माझी मुलंच माझे खरे मित्र आहेत,” असं त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं.
 
 
गोविंदा आणि सुनीता यांनी यंदाची गणेश चतुर्थी एकत्र साजरी करून सार्वजनिकरित्या आपल्यातील संबंध टिकून असल्याचं दाखवलं होतं. यामुळे घटस्फोटाच्या अफवांना काहीअंशी पूर्णविराम मिळाला होता. मात्र, त्यांच्या नात्यातील अंतर आणि कुटुंबातील वाद हे अजूनही त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.सुनीता आहुजांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीतली अनेक दाट धुके दूर झाली असून, चाहत्यांना या लोकप्रिय जोडप्याच्या खऱ्या नातेसंबंधांची थोडी अधिक स्पष्ट कल्पना मिळाली आहे. गोविंदा यांच्याकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली, तरी सुनीता यांच्या या वक्तव्याने चर्चेला नवा आयाम मिळाला आहे.