दुर्गा मंडळाजवळील इमारतीत जुगार अड्ड्यावर धाड

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
सहायक पोलिस अधीक्षकांनी स्वतः टाकली धाड
२,१३,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुसद, 
पापिनवार लेआऊटमधील एका दुर्गा मंडळाजवळ असलेल्या इमारतीत नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी सुरू असलेल्या Illegal gambling dens अवैध जुगार अड्ड्यावर सहायक पोलिस अधीक्षकांनी मध्यरात्रीनंतर धाड टाकली. यात अवैधरित्या जुगार खेळणार्‍या १६ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रकमेसह २ लाख १३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २ ऑक्टोबरच्या रात्री २ च्या दरम्यान केली.
 
 
Jugar
 
Illegal gambling dens निखिल ज्ञानेश्वर गादेवार (वय ४२, पापीनवार लेआऊट), यशपाल बाबुसिंग जाधव, प्रमोद जिता राठोड (३४, श्रीरामपूर), शेख वसीम शेख शकील (२७, शंकरनगर), सोमेश दिलीप जयस्वाल (३१, शंकरनगर), शशांक अरुण नाईक (३५, श्रीरामपूर), मयूर श्रीराम भरगाडे (३६, डुबेवार लेआऊट), राहुल सुभाष राठोड (३०, आमटी), रेवीचंद चव्हाण (४३, धनकेश्वरनगर), आशिष प्रेमसिंग पवार (३२, धनकेश्वरनगर), प्रवीण संभाजी कास्टे (३१, नवीन पुसद), दीपक धारेराव वानखेडे (३४, सावंगी), मारोती साहेबराव राऊत (३५, विठाळा वार्ड), विशाल गजानन भालेकर (३५, सावंगी), विपीन श्रीराम आडे (२६, आमटी) या १६ जुगार्‍यांवर कारवाई करण्यात आली.
 
 
पोलिस सूत्रांनुसार, तालुक्यात सणउत्सव काळात सुरू असलेले धंदे आटोक्यात आणण्यासाठी पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहपोलिस अधीक्षकांनी कंबर कसली आहे. त्यामुळे Illegal gambling dens अवैध धंदे करणार्‍याचे धाबे दणाणले आहेत. येथील उच्चभ्रू पापिनवार लेआऊटमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर २ च्या दरम्यान रात्रीच्या गस्त दरम्यान सहपोलिस अधीक्षक हर्षवर्धन यांना या जुगाराची माहिती मिळाली. या इमारतीत काही लोक हारजित व तीनपत्ती जुगार पैशांची लावून खेळत असल्याच्या माहितीवरून, त्यांनी तत्काळ सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत १६ जुगार्‍यांना रंगेहात अटक केली. यात ३४ हजार रुपये किंमतीचे ७ मोबाईल, १ लाख ७५ हजार रुपयांच्या मोटर सायकल व ४ हजार ४६० रुपये नगदी असा एकूण २ लाख १३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.