लोकायन
सुधीर पाठक
lokayan वृत्तपत्रीय धबडग्यात काही घटना अशा घडतात ज्या वृत्तपत्राच्या इतिहासात कायम लक्षात राहतात. अशाच घटनांपैकी एक म्हणजे १९७१ ला बांगलादेश निर्मितीचे युद्ध. पूर्व पाकिस्तान इतिहासातून मिटण्याचे युद्ध. या युद्धाचे रूप वेगळे होते. त्याआधी १९४८, ६२ आणि ६५ ही तीन युद्धे भारतावर लादली गेली तर ७१ जे युद्ध हे भारताने बांगलादेशच्या निर्मितीसाठी, पूर्व पाकिस्तान संपविण्यासाठी केले होते, ते निखळ विजयश्री मिळवून देणारे युद्ध होते. त्या युद्धात तरुण भारत नागपूर व पुणे या दोघांचाही आगळावेगळा सहभाग होता.
lokayan तरुण भारत नागपूरमध्ये छायाचित्रकार असणारे जयंतराव हरकरे हे तरुण भारतात येण्यापूर्वी नौदलात होते. युद्धाचे वातावरण निर्माण होऊ नौदलाने हरकरे या त्यांच्या नौसैनिकाला त्यांच्या सेवेत पुन्हा बोलावून घेतले. एक जाणकार डायव्हर (पाण्याखाली जाऊन काम करणारे) होते. तरुण भारतनेही लागलीच त्यांना देशसेवेसाठी धाडले. तर, त्यावेळी तरुण भारत पुणे यांनी गजाननराव मेहंदळे या तरुण पत्रकाराला युद्ध वार्ताहर म्हणून पाठविले होते. तेही युद्ध सुरू होण्याच्या जवळ जवळ पाच-सहा महिने आधी. आठ महिने ते पूर्व पाकिस्तानात होते. त्याचवेळी टाइम्स आणि महाराष्ट्र टाइम्स यांनी युद्ध वार्ताहर म्हणून दि. वि. उपाख्य बंडोपंत गोखले यांना पूर्व पाकिस्तानात पाठविले होते. हे सर्व आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे गजाननराव मेहंदळे यांचे नुकतेच झालेले निधन. ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ते जगाला, मराठी विश्वाला, इतिहासकार जास्तीत ज्ञात आहेत. हरकरे, मेहंदळे आणि गोखले यांच्यात एक समान धागा होता तो म्हणजे तिघेही मुळातून संघ स्वयंसेवक होते. बाळासाहेब हरकरे हे पूर्व पाकिस्तानात होते, पण त्यांना ना वृत्तपत्रासाठी छायाचित्रण करता आले ना त्यासंबंधी एकही ओळ लिहिता आली. कारण ते नौदलाचे शिस्तबद्ध सैनिक होते. बाळासाहेब हरकरे यांना छायाचित्रणासाठी पहिला श्री गुरुजींनी दिला होता. संघाच्या कार्यक्रमाचेच छायाचित्रण त्यांनी सुरू केले. त्यावेळी बाळासाहेबांना संघ अधिकार्यांचा भरपूर ओरडा सहन करावा लागला होता, बोलणी खावी लागली होती. गणवेशातील एक स्वयंसेवक संघ दक्षचा आदेश झाल्यावरही जागेवर दक्ष स्थितीत उभे राहण्याऐवजी हलतो आहे. इकडे तिकडे फिरत फोटो काढतो आहे. अगदी प्रार्थनेच्या वेळीही प्रार्थना न प्रार्थनेचे चित्रण करतो आहे, हे सर्व संघ शिस्तीत न बसणारे होते, शिस्तीच्या विपरीत होते. मात्र बाळासाहेब ही सर्व बंधने झुगारून देत चित्रण करीत राहिले. म्हणूनच अनेक जुनी छायाचित्रे आज जगाला उपलब्ध होऊ शकलीत. असे हे बाळासाहेब बांगलादेश युद्ध संपल्यानंतर तीन-चार महिन्यांनी पुन्हा तरुण भारतच्या सेवेत आले. त्यानंतर सेवानिवृत्तीचे वय ते तरुण भारतातच राहिले.
lokayan गजाननराव वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी पत्रकार म्हणून पूर्व पाकिस्तानात गेले होते. पूर्व पाकिस्तानच्या विविध सीमा भागात प्रवास करून त्यांनी त्या त्या भागाचे वृत्त संकलन केले होते. पूर्व पाकिस्तानातील सर्व बाजूंनी सीमा त्यांनी ओलांडल्या होत्या. बांगलादेश मुक्ती वाहिनीच्या क्रांतिकार्याचे वृत्त संकलन त्यांनी त्या काळी केले सीमावर्ती भागातील परिस्थिती त्यांनी अनुभवली, अभ्यासली आणि त्यावरील त्यांची वार्तापत्रे खूप गाजली होती. विविध लोकांच्या मुलाखती घेतल्यात आणि पाकिस्तानींविरुद्ध बांगलादेशमध्ये किती रोष आहे, याचा अनुभव त्यांनी घेतला, त्याचा परिचय जगालाही करून दिला. त्यांनी लिहिलेली वार्तापत्रे ते तारेने पुणे तरुण भारताला पाठवत. त्यानंतर प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले त्यावेळीही गजानन बांगलादेशातच बांगलादेश मुक्ती वाहिनीच्या एका गटाबरोबर ते प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रातही वावरले होते. तिथे तळ ठोकून बसलेल्या भारतीय सेना अधिकार्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. युद्ध विजयाची वार्ता त्यांनी पुणे तरुण भारतला पाठविली. बांगलादेश निर्मितीनंतर काही दिवसांनी ते दिल्लीत परतले. त्यांनी बांगलादेश युद्धावर एक पुस्तक लिहिले, पण प्रकाशित मात्र होऊ शकले नाही. मात्र युद्ध आणि युद्ध शैली त्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव हा सगळा भाग त्यांच्या अध्ययनाचा झाला. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धनीतीवर व महाराजांच्या लष्करी दृष्टिकोनावरही पुस्तक लिहायचे ठरवले. यात सर्वात गंमत म्हणजे युद्ध वार्ताहर म्हणून काम करणार्या या पत्रकाराने १९६९ पासून युद्ध आणि युद्धतंत्र यांचा अभ्यास करणे सुरू व अवघ्या दोन वर्षांत त्यांना युद्धभूमीवर जाण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले, चीज केले. एक नवीन अभ्यासक, इतिहास-अभ्यासक जगाला मिळाला.
शालेय जीवनापासून इतिहास या त्यांचा आवडता विषय होता आणि पुढे डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रजी, जर्मनी या भाषा व उर्दू, फारशी आणि मोडी लिपीही त्यांना ज्ञात होती. पातळीवर त्या भाषांवर त्यांचे स्वामित्व होते. त्यांनी पुणे विद्यापीठातून संरक्षण व सामाजिक शास्त्र या विषयात एमए केले. त्यावेळी युद्धशास्त्राचा अभ्यास करताना शिवाजी महाराजांच्या चरित्राचा पूर्ण अभ्यास करण्याकडे वळले. त्या अभ्यासासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. मूळ साधने व मुस्लिमांची साधने अभ्यासणे हे त्यांनी बरोबर जुळविले होते. अभ्यासकांशी केलेल्या प्रदीर्घ हा देखील त्यांच्या अभ्यासाचा भाग होता. त्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषेत शिवाजी महाराजांवर डहर्ळींरक्षळ हळी श्रळषश रपव ढळाशी या नावाचे पुस्तक लिहिले. हा त्यांच्या ग्रंथराज १००० पानाचा आहे तर मराठीतील ‘श्री राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ अडीच हजार पानांचा आहे. त्यामध्ये ७००० वर संदर्भ त्यांनी दिलेले आहेत. पुण्याच्या भारत इतिहास संशोधन त्यांचा कायम संबंध राहिला. समाजाच्या आधारावर चालणार्या अशा संस्था या रडतखडतच चालतात; तशीच ही संस्था चालविण्याबाबत ते आग्रही होते. कोणत्यातरी विद्यापीठाबरोबर संलग्न करून घेऊन आर्थिक स्थिरस्थावर होण्याला त्यांच्या विरोध होता. एकदा सरकारी यंत्रणेशी जोडल्या गेले की, सत्य सांगण्यावर मर्यादा येतात, असे त्यांचे चिंतन होते. फक्त भारतातच नव्हे, तर जगातील देशात सरकार हा त्याच्या सोयीचा इतिहास लिहीत असतो, या मतावर ते ठाम होते. इतिहास संशोधक म्हणून आपण फक्त इतिहास सांगितला पाहिजे. त्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचे अध्ययन केले पाहिजे. याबाबत त्यांच्या मनामध्ये कुठलाही संशय नव्हता.
एकदा त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसे मारले, वाघनखांनी, तलवारीने की अन्य साधनांनी? शिवाय पहिला घाव कोणी घातला होता, महाराजांनी की खानाने?’ गजाननराव शांतपणे म्हणाले, ‘शिवभारतमध्ये जे आहे ते प्रमाण आहे. बाकी मला काही माहीत नाही. आधी कुणी मारले, कशाने मारले वगैरे बघायला मी त्या ठिकाणी हजर नव्हतो. मात्र जी कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्यावरून एक नक्की आहे की, जावळीच्या खोर्यात खान गेला आणि महाराजांनी त्यानंतर झटपट हालचाली करून खानाचे सैन्य कापून काढले आणि महाराष्ट्राचा भगवा पुढे नेला. आपले काम इतिहास सांगण्याचे, त्याचा अन्वयार्थ लावण्याचे काम आपले नाही. तो अन्वयार्थ बाकीच्यांनी लावायचा. अशा या वृत्तीमुळे त्यांच्याबद्दल इतिहास संशोधकात त्यांच्या अत्यंत आदर होता आणि दबदबाही सर्वत्र होता.
बाबरी ढाच्या पडणे व राम निर्मिती या काळात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचे कौतुक सर्वत्र झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ‘सोशल सायंटिस्ट’ या ९० च्या मासिकात २५ प्राध्यापकांच्या सहीने एक लेख छापून आला होता. त्या लेखात म्हटले होते, बाबराने अयोध्येला राम मंदिर पाडण्याचे आदेश दिले व ते मंदिर पाडले, याचा कुठलाही पुरावा नाही. त्या पत्रकावर सह्या अनेक महत्त्वाची नावे होती. एक नाव होते सर्वपल्ली गोपाल. हे आपले तत्त्वज्ञ राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे चिरंजीव. रोमिला थापर, हर्बन सुखिया, पण्णीकर यांच्याही सह्या होत्या. त्याचा प्रतिवाद करताना गजाननराव मेहंदळे यांनी फक्त एवढेच सांगितले की, ‘बाबर नामा’ हा जो ग्रंथ आहे त्यातील अधली-मधली काही पाने गहाळ आहेत. ती कोणत्याही अद्याप मिळालेली नाहीत. म्हणून बाबर नामाची जी उपलब्ध कागदपत्रे आहेत त्याप्रमाणे बाबर अयोध्येत पोहोचला होता, एवढे खरे आहे. तेवढाच संदर्भही आहे. बाबर नामाची पुढील पाने मिळाली आणि त्यात जर लक्षात आले की, असा कुठलाही आदेश बाबराने दिला नव्हता तर या लोकांचे म्हणणे खरे ठरू शकते, पण त्यांनी आपल्या पत्रकात सांगितलेच नाही की, बाबर नामाची पान उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचे पत्रक हे अर्धसत्यावर आधारित आहे आणि अर्धसत्य हे देखील सत्य दडविणेच असते. कुठलेही विधान करताना उपलब्ध कागदपत्रांच्या आधारावर ते करायचे हा गजाननराव यांचा खाक्या होता. कागदपत्रांशिवाय ते कधीच बोलले नाहीत.
ते एक किस्सा नेहमी सांगायचे की, असत्य हे सत्यापेक्षा गतिमान असते. एखाद्या वेळी सत्य काय आहे हे सांगण्यासाठी सत्याने बाहेर पडायचे ठरविले आणि त्यासाठी पायात वाहाण घालणे सुरू केले तर तो बाहेर पडण्यापूर्वीच असत्याने किंवा अर्धसत्याने अर्धे जग पार केलेले असते. गतीमधील ही तफावत आपल्याला नेहमीच दिसते, जाणवते आणि म्हणून सत्य सांगायचे नसते, असे काही नाही.
lokayan सत्या-असत्याचा फटका भांडारकर प्राष्यविद्या संस्थेवर झालेल्या हल्ल्यातही बसला होता. हा हल्ला झाला त्यावेळी उत्स्फूर्तपणे त्याचा निषेध पहिल्या दिवशी झाला, त्यानंतर मात्र या प्रकरणाला वेगळे वळण लागले. त्यानंतर जे घडत गेले त्याचा फटका शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाही बसला. बाबासाहेबच होते म्हणून त्या फटक्यातून ते सावरले. पण त्यानंतर त्यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण हा त्यांना सहजतेने स्वीकारता आला नाही. आपल्या घरी बाबासाहेब ज्या खोलीच्या भिंतीला टेकून बसत, त्या खोलीबाहेरच त्यांच्या नावाने शिमगा सुरू असे. हा फटका जसा बाबासाहेबांना बसला, तसाच मेहंदळे यांनाही बसला. भांडारकर संस्थेप्रमाणेच हे सर्वजण त्यानंतर सावरलेत, पण या सगळ्यांना बसलेले चटके मात्र दाहकच होते. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदुत्वापासून वेगळे करण्याचा अनेक वेळा झाला, पण ते सर्व प्रयास गजाननराव मेहंदळे यांनी अस्सल कागदपत्रांसह कधीही यशस्वी होऊ दिला नाही.
बाबासाहेब पुरंदरे, गजाननराव मेहंदळे, निनाद बेडेकर व आपल्या नागपूरचे शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी शिवचरित्राच्या केलेल्या कथनामुळे महाराष्ट्रातील तरुण पिढीला बालकांपासून सगळ्यांना महाराजांबद्दलचा आदर, सन्मान आणि अभिमान बाळगण्याची प्रेरणा मिळाली.
खरं तर गजाननराव यांचे कार्य इतके मोठे होते की, त्यांना शासनाने पद्म पुरस्कार देऊन गौरविले पाहिजे होते. त्यांच्या निधनानंतर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी त्या इतिहास पुरुषाला श्रद्धांजली अर्पण करून ज्ञानयोग्याचा सन्मान केला. एका स्वयंसेवकासाठी सरसंघचालकांनी त्याच्या गौरवाची फुले उधळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनानंतर शोकसंवेदना केल्या.
अशा या इतिहासकाराला, युद्ध वार्ताहर करण्यासाठी तरुण भारत पुणे यांनी त्यांना पाठविणे आणि तरुण भारत नागपूरने जयंतराव हरकरे यांना सुट्टी देऊन युद्धात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. हाही एक इतिहास यानिमित्ताने अधोरेखित झाला.
८८८८३९७७२७