महागाव येथे खड्ड्यात पडून बहिण-भावाचा मृत्यू

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
दारव्हा, 
तालुक्यातील Mahagaon case महागाव कसबा येथील खेळायला गेलेल्या दोन निष्पाप बहिण-भावांचा लेआऊटमधील एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना महागाव कसबा येथील साईनगरीत बुधवार, १ ऑक्टोबरला उघडकीस आली. प्रियंका गणेश राठोड (वय १०) व कार्तिक गणेश राठोड (वय ८, महागाव कसबा) अशी मृत चिमुकल्यांची आहेत. महागाव कसबा बसस्थानकालगत साईनगरी लेआऊट आहे. यामध्ये असलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी तुडुंब साचले. तिथे खेळायला गेलेल्या दोघांचा या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
 
 
Mahagaon
 
लेआऊटमालकाने खड्डा खोदताना कुठलीही उपाययोजना केली नव्हती. खड्ड्याच्या सभोवताल सुरक्षाफलक लावले नाही. एकंदरीत त्यामुळेच दोन निरागस मुलांचे प्राण गेले आहेत. प्रियंका व कार्तिक हे दोघेही घरी आल्याने वडील गणेश राठोड यांनी त्यांचा ३० सप्टेंबरला खूप शोध घेतला. मात्र ते मिळाले नाहीत. दरम्यान बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना समोर आली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.
 
 
Mahagaon case  लाडखेडचे ठाणेदार विनायक लंबे व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान ग्रामस्थांनीही मोठी गर्दी होती. लोकांनी संताप व्यक्त करीत त्यांनी संबंधित लेआऊट मालकावर कारवाईची मागणी केली. प्रियंका ही इयत्ता चवथीत तर कार्तिक दुसरीत शिकत होता. या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असताना आता या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.