शिवनेरी ग्रुप द्वारा आयोजित नामदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2025 थाटात संपन्न

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
खामगाव,
Garba Utsav 2025 स्थानिक शिवनेरी ग्रुप खामगाव च्या वतीने नवरात्री उत्सवामध्ये नामदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2025 चे आयोजन भव्य दिव्य स्वरूपात नगर परिषद शाळा क्रमांक ६, टॉवर चौक खामगावयेथे 21 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबरपर्यंत रोज सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते. नेहमी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवनेरी ग्रुप द्वारा आयोजित नामदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2025 चे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते. 03 ऑक्टोंबर ला गरबा उत्सवाचे भव्य- दिव्य उदघाटन वसुंधरा फाउंडेशन चे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल चे प्रदेश उपाध्यक्ष श्री.सागर दादा फुंडकर यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.
 

Namdar Akash Dada Fundkar Garba Utsav 2025, Shivneri Group Garba Khamsgaon, Garba Festival Maharashtra 2025, Akash Dada Fundkar Garba Event, Khamsgaon Garba Celebration, Navratri Garba Events 2025, Garba Competitions Maharashtra, Garba Princess Neha Khanchandani, Garba Queen Devyani Ugale, Garba Prince Kumar Yuvraj Sharma, Khamsgaon cultural events, Navratri Garba Khamsgaon, Garba festival sponsors Khamsgaon, BJP leaders Garba Maharashtra, Garba event organization Maharashtra, Traditional Garba Maharashtra 
त्यानंतर Garba Utsav 2025  गरबा प्रशिक्षण शिबिर फिनाले राऊंड,रेट्रो मेट्रो,प्रोप,ग्रुप गरबा,प्रिन्स, प्रिन्सेस व क्वीण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वरील सर्व स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावर्षीच्या नामदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2025 चे प्रिन्सेस कुमारी नेहा खानचंदाणी फ्रिज, क्वीन सौ. देव्यानी उगले यांना वॉशिंग मशीन, व प्रिन्स कुमार युवराज शर्मा याला LED TV व ट्रॉफी तथा विविध स्पर्धा मध्ये विजय झालेल्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रवेश द्बारा वर आपल्या संस्कृतीला शोभेल असा अष्टगंद टिळा लावूनच प्रवेश देण्यात आले. या विषयाची आणी उपस्थित संख्यांची संपूर्ण खामगाव शहरात चर्चा सुरु होती. व शिवनेरी ग्रुपच्या या उत्सवामध्ये महिलांचा गरबा खेळण्याकरिताचे प्रमाण ही सर्वांत जास्त असायचा. म्हणून खामगाव शहरात फक्त शिवनेरी ग्रुप च्या गरबा उत्सवाची जोरदार चर्चा सुरू होती.
 
 
विशेष करून गरबा Garba Utsav 2025  खेळण्याकरिता खामगाव तालुक्यातील कुंबेफळ, जळका भंडग,ढोरपगाव, वाडी,सुटाळा तसेच नांदूरा येथून ही गरबा प्रेमीं मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते.शिवनेरी ग्रुप च्या वतीने आयोजित नामदार आकाश दादा फुंडकर गरबा उत्सव 2024 ला टायटल पार्टनर म्हणून नामदार आकाश दादा फुंडकर तसेच विशेष सहकार्य सागरदादा फुंडकर, यासह स्टेज पार्टनर म्हणुन सरस्वती ग्लासचे संचालक श्री मनोहरलालजी जांगिड, ग्राउॅड पार्टनर म्हणून काका स्टोन क्रशर चे संचालक श्री महेंद्र काका रोहणकार, तिकीट पार्टनर म्हणून इंग्लिश झोन अकॅडमी चे संचालक श्री गणेश खारोडे सर, ट्राफी पार्टनर म्हणून खामगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष छत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. स्वप्नील दादा ठाकरे पाटील, सेंटर पिलर पार्टनर म्हणून स्वराज फॅशनचे संचालक श्री. स्वप्निल कामठे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष श्री. अशोकजी सोनोने, भाजपा युवा मोर्चा खामगाव विधान सभा प्रमुख पवनजी गरड, ठाकरे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. निखिलदादा ठाकरे पाटील,विजयलक्ष्मी ग्रुप चे अध्यक्ष श्री. अजिंक्य देशमुख,शिवशक्ती ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक श्री. स्वराज बढे पाटील,अमर कोटींगचे संचालक नित्यानंदजी जांगीड, Royal Enfield चे संचालक श्री. कदम दादा, महाराष्ट्र मेडिकल चे संचालक श्री अशोकजी जयस्वानी,हॉटेल शिवशाही वाडा चे संचालक श्री अतुल शिरसाट,अग्रवाल काॅक्रेजचे संचालक सुरज अग्रवाल, शर्मा फोम हाऊस चे संतोष शर्मा,अभी चावरे, Max clothings चे संचालक ऋषी पऱ्हाड, न्यू कुकरेजा टायर चे संचालक श्री. विजय जी कुकरेजा,अभिलाष मुऱ्हे,शाकुंतल ब्युटी पार्लर च्या संचालिका आरतीताई मुळे व शार्क नेल्स च्या संचालिका पूजा मुळे, सुपर शेअर मार्केट चे संचालक संतोष शिंदे,शिवनेरी ग्रुप चे सल्लागार हनुमंतजी भोसले, शिवनेरी ग्रुप गरबा उत्सव समिती 2025 चे अध्यक्ष श्री हर्ष (गोलू) महातो, रवी जांगिड, अभिषेक रोहणकार, किशोर लोखंडे, यांच्या सह स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धक तसेच गरबा प्रेमीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
 
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवनेरी ग्रुप चे सदस्य ऋषिकेश कावणे, संकेत सुराणा ,यश भागदेवाणी, श्याम मोरे,प्रसाद बाटे, विजय बोर्डे,पवन डिक्कर, तुषार चंदवाणी, हर्षल जुनगडे,रोहित माळवंदे ,सूरज वडोदे, ऋतिक मुंढे, ऋषिके माहूरकर, शुभम सायंदे, केशव बोराडे अहोरात्र मेहनत घेतली. यासह महिला सदस्य सौ. भाग्यश्रीताई रोहनकार, सौ मीनाताई जांगिड, सौ. जानवी ताई कुलकर्णी, सौ भाग्यश्रीताई मानकर, सौ रत्नाताई डिक्कर,सौ. नेहा ताई जांगिड, सौ. श्रुतीताई महातो, सौ श्रद्धाताई धोरण,सौ गायत्रीताई डिक्कर,सौ प्रज्ञा सुराणा, सौ भक्ती वाणी, कु स्नेहा पिवळटकर,कु साक्षी पाटील,कु लक्ष्मी वरखेडे, कु शितल वरखेडे, कु श्रृती मांडवेकर यांनी सुध्दा महत्वाचा सहभाग नोंदवीला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पिवळटकर हिने केले तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष प्रतीक मुंढे पाटील यांनी केले.तसेच या गरबा उत्सवा दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच नगर परिषद शाळा क्रमांक 6 चे शिक्षक वृंद, पत्रकार बांधव यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य केल्याबद्दल शिवनेरी ग्रुप तर्फे सर्वांचे खुप खुप आभार.