नवी दिल्ली,
ncrb report देशभरात गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः खून, बलात्कार, अपहरण आणि चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये हे नाबालिग गुन्हेगार अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) ताज्या 2023 सालच्या अहवालानुसार, राजधानी दिल्लीसह अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांची भूमिका चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे.
दिल्लीमध्ये गुन्ह्यांच्या ४१ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये नाबालिग आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगडमध्ये ३६ टक्के तर पुडुचेरीमध्ये २७ टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आरोपी सामील होते. राज्यांच्या बाबतीत छत्तीसगड आणि हरियाणा हे राज्य सर्वाधिक प्रभावित असून, या ठिकाणी १७ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये नाबालिग गुन्हेगार सहभागी होते. यानंतर तामिळनाडूमध्ये १४ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग आढळून आला.
NCRB च्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये देशात ३०,५५५ गुन्ह्यांमध्ये नाबालिग आरोपी होते, तर २०२३ मध्ये ही संख्या वाढून ३१,३६५ इतकी झाली आहे. विशेषतः खुनाच्या ९९५ आणि खुनाचा प्रयत्न झालेल्या १४७६ प्रकरणांमध्ये नाबालिग आरोपी होते. यातील सहा गुन्हे १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडून तर ३०८ प्रकरणे १२ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांकडून घडले. या आरोपींमध्ये सात मुलींचाही समावेश आहे.बलात्काराच्या एकूण ९७७ प्रकरणांमध्ये नाबालिग आरोपी होते. त्यापैकी १० प्रकरणांमध्ये आरोपींचे वय १२ वर्षांपेक्षा कमी होते, तर २६४ प्रकरणांमध्ये ते १२ ते १६ वर्षांच्या दरम्यान होते. हे आकडे अत्यंत धक्कादायक असून, बालवयातील मुलांचे गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे.
या अल्पवयीन ncrb report मुलांनी केवळ गंभीर गुन्ह्यांमध्येच नव्हे, तर इतर प्रकारच्या हिंसक आणि संपत्तीविरुद्ध गुन्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचे दिसते. दंगलींमध्ये बालगुन्हेगारांचा सहभाग प्रौढांच्या तुलनेत कमी नाही. चोरीच्या ६५५७ प्रकरणांमध्ये तर सेंधमारीच्या २०१५ प्रकरणांमध्येही नाबालिग आरोपी आढळून आले आहेत. याशिवाय अपहरणाच्या ९३१ प्रकरणांमध्ये आणि गंभीर स्वरूपाच्या मारहाणीच्या ५८३६ प्रकरणांमध्येही या वयोगटातील आरोपींचा समावेश आहे.विशेष म्हणजे, काही प्रकरणांमध्ये आरोपींचे वय फक्त १२ वर्षांच्या आत होते, जे न्याय व्यवस्थेसाठी आणि समाजासाठीही गंभीर इशारा आहे. समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यावर विचार करत असताना अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, डिजिटल माध्यमांचा अतिरेक, कुटुंबीयांचा दुर्लक्ष, शिक्षणाची उणीव आणि सामाजिक नियंत्रणाचा अभाव यामुळे अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे.
या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष देत, सरकार आणि संबंधित यंत्रणांनी बालगुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा ही समस्या भविष्यात अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते, असा इशाराही तज्ज्ञांकडून दिला जात आहे.