ज्येष्ठांनो, जीवनातील प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त साधला संवाद
 
नागपूर,
कोण काय म्हणतो, कोण काय विचार करतो, याची चिंता करण्यापेक्षा आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari  नितीन गडकरी यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने संताजी सभागृहात तेली समाज सभेच्या सौजन्याने आयोजित ज्येष्ठ नागरिक संमेलनाच्या उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता मेघे, प्रा. अनिल सोले, राजू मिश्रा, बाबासाहेब नंदनपवार, नाना ढगे, अशोक मानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
jeshta-nagarik-gadkari-one
 
Nitin Gadkari नितीन गडकरी पुढे म्हणाले, ‘ज्याचा जन्म झाला, त्याचा मृत्यू अटळ आहे. याला कुणीही अपवाद नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणायचे, ‘एखादी व्यक्ती किती जगली, ती कशी जगली, हे अधिक महत्त्वाचे त्यामुळे आपल्याला मिळालेले जीवन आनंदात घालविण्याचाच विचार करावा. त्यासाठी आपले व्यक्तित्व, विचार करण्याची पद्धत, आपला स्वभाव हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातूनच आनंद निर्माण होऊ शकतो.’
 
 
Nitin Gadkari  ‘छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतल्याने आपण अस्वस्थ होत असतो. अश्याने जीवनाचा आनंद घेता येणार नाही. कारण आनंद कुठल्याही बाजारात मिळत नाही. तो तुम्हाला छोट्या गोष्टींमध्ये शोधावा लागणार आहे. याप्रसंगी दत्ता मेघे म्हणाले, ‘अनुभवाने समृद्ध असलेले ज्येष्ठ नागरिक समाजाला दिशा देणारे असतात. त्यादृष्टीने तरुण पिढीला ज्येष्ठांचा आदर करण्याचा संदेश देणारे आजचे आयोजन आहे.’ बाबासाहेब नंदनपवार म्हणाले, ‘वृद्धत्व हा जगाचा नियम आहे. पण वृद्ध होणे हा नियम नाही. आपल्याला ज्येष्ठ व्हावे लागते. ज्येष्ठांनी जगण्याची बदलली पाहिजे आणि नियोजन केले पाहिजे.’