दोनद येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

८ जण ताब्यात, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
police raid धनज बु.पोलिसस्टेशन हद्दीतील दोनद बु. जालना रोडवरील टिनपत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १ ऑटोबर च्या रात्रीदरम्यान करण्यात आली. विशेष पथक अधीक्षक कार्यालयाचे पोउपनि. सचिन गोखले यांच्या नेतृत्वाखाली धनज बू. पोलिस स्टेशनच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
 

पोलीस  
 
 
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये प्रविण साहेबराव पोले रा. दोनद, किरण श्रीरामजी कुंबलकर रा.मोझरी, अमरावती, निकेश दामोदर ब्राम्हणवाडे रा. नांदगाव खंडेश्वर, अब्दुल रफिक अब्दुल हाफिज रा. नांदगाव खंडेश्वर, पुरुषोत्तम साहेबराव पाठे रा. वरखेडा, दत्ता रमेशराव लाड रा. नांदगाव खंडेश्वर, मंगेश मोतीराम बोंडाने रा. जवळा धोतरा, संजय पुंडलिक मारबदे रा. वरुड, यवतमाळ यांचा समावेश आहे. या छाप्यात पोलिसांनी आरोपींना जुगार खेळताना रंगेहात पकडले.police raid जप्त मुद्देमालामध्ये ५२ ताशपत्ते, रोख १ लाख ४७ हजार २५० रुपये, आठ मोबाईल फोन (किंमत सुमारे ६३ हजार रुपये) तसेच सात वाहने (किंमत २८ लाख ९० हजार रुपये) यांचा समावेश आहे. एकूण जप्त मालमत्ता ३१ लाख २५० रुपये एवढी झाली आहे.या सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास धनज बु.पोलिस स्टेशनचे सपोनि भारत लसंते करीत आहेत.