चिखली,
sangh-chikhali-nagar चिखली नगराचा श्री विजयादशमी आणि शस्त्र पूजन उत्सव शनिवार दि ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता तालुका क्रीडा संकुल, बस स्टँडच्या बाजूला ,चिखली येथे संपन्न होणार आहे.
या उत्सवाचे प्रमुख राजघराणा कापड केंद्राचे संचालक व योग प्रशिक्षक प्रवीण पडघान हे राहणार असून अखिल भारतीय संघटन मंत्री वनवासी कल्याण आश्रम केंद्र मुंबईचे अतुल जोग हे प्रमुख वक्ते राहणार आहे. sangh-chikhali-nagar तरी नागरिक बंधू, माता भगिनी यांनी सहकुटुंब उपस्थित राहून रा. स्व. संघाप्रति प्रेम व्यक्त करावे असे आवाहन चिखली नगर कार्यवाह मिलिंद हिवाळे यांनी केले आहे शनिवारी पाऊस असल्यास कार्यक्रम आदर्श विद्यालयाच्या सभागृहामध्ये होईल असे आयोजकांनी कळविले आहे