अनिल कांबळे
नागपूर,
AI and drone technology शहरात दसरा महाेत्सव आणि दीक्षाभूमीवरील कार्यक्रमासाठी पाेलिसांचा ‘एआय आणि ड्राेन’वर आधारित बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. पाेलिसांनी तंत्रज्ञानाची सांगळ आणि अचूक नियाेजन करीत बंदाेबस्त यशस्वी झाला, असे प्रतिपादन पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
दीक्षाभूमीवर दरवर्षी देशभरातून लाखाे अनुयायी एकत्र येतात, त्यामुळे माेठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण हाेते. या ठिकाणी सार्वजनिक सुरक्षिततेचे नियाेजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण काेणत्याही असुरक्षित घटनेचा परिणाम माेठ्या संख्येवर लाेकांवर हाेऊ शकताे, ही बाब लक्षात घेता शहराचे पाेलीस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांनी बंदाेबस्ताचे नियाेजन केले हाेते. दीक्षाभूमी बंदाेबस्तात सार्वजनिक सुरक्षिततेसाठी आधुनिक ‘एआय‘ AI and drone technology तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. सुमारे 100 सीसीटीव्ही कॅमेरे एआय सिस्टीमशी जाेडले आहेत. हे कॅमेरे ‘सिंबा डेटाबेस’शी संलग्न आहेत, त्यामुळे काेणताही गुन्हेगार येताच त्याची त्वरित ओळख पटविण्यात आली तसेच, गर्दीचे प्रमाण सतत माेजले गेले. जास्त गर्दी असलेले ठिकाण ओळखून तिथे अतिरिक्त बंदाेबस्तसाठी पाेलिस तैनात करण्यात आले हाेते. जनसमूहाच्या हालचालींचे निरीक्षण करून संशयास्पद हालचाली आढळल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यात आले. काेणतेही विवादास्पद बॅनर किंवा चिन्ह दिसताच त्वरित अलर्ट पाेलिसाना येत असल्याने किंवा संशयास्पद वस्तू ओळखून तत्काळ सूचना एआय कार्यप्रणालीद्वारे दिली जात असल्याने सर्व उपाययाेजनांमुळे परिस्थितीची सतत जाणीव ठेवण्यास मदत झाली. सार्वजनिक सुरक्षेसाठी जलद व माहिती-आधारित कारवाई करण्याची क्षमता वाढली.
याचाच भाग म्हणून, शहराचे पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यानी दीक्षाभूमी येथे ड्राेन सिस्टीमद्वारे निगराणी व ‘रिअल-टाइम फुटाॅल माॅनिटरिंग’ तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष परीक्षण केले. सुरक्षेच्या दृष्टीने राबवलेली ही अत्याधुनिक एआय तांत्रिक उपाययाेजना दीक्षाभूमी बंदाेबस्त दरम्यान शहर पाेलिसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असून शहरातील सार्वजनिक सुरक्षिततेच्या कार्यक्षमतेत महत्त्वपूर्ण याेगदान देत आहे.