टीईटी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
नागपूर,
TET exam राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३ नोव्हेंबर रोजी घेण्याचे नियोजित आहे. या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत होता. परंतु महाराष्ट्रात काही जिल्हयामध्ये अतिवृष्टी व पुरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्याने परीक्षार्थी / उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी ९ ऑक्टोबर रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 

 TET exam 
तसेच विद्यार्थी/उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी/उमेदवारांना नेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड द्वारे विहित कालावधीत रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. संबंधित परीक्षार्थी/उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे .