ऑक्टोबरमध्येही राज्यात पावसाचा धोका!

मराठवाडा सर्वाधिक प्रभावित होणार

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
मुंबई,
There is a risk of rain even in October यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरही राज्यात अजून परतीचा प्रवास सुरू झालेला नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. विशेषत: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यात एकूण ११८९.४ मिमी पावसाची नोंद झाली असून तो सरासरीपेक्षा तब्बल १२० टक्के अधिक आहे.
 
 
 
There is a risk of rain even in October
 
गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात १२५२.१ मिमी पाऊस झाला होता, जो २६ टक्के जास्त होता. सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या चार महिन्यांत सर्वाधिक पाऊस सप्टेंबर महिन्यात झाला. विशेषतः मराठवाड्यात ३९ टक्के अधिक आणि मध्य महाराष्ट्रात २० टक्के अधिक पाऊस झाला. मध्य सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि सोलापूर परिसरात शेतजमिनी, There is a risk of rain even in October घरे आणि अनेक संसार उद्ध्वस्त झाले. हवामान विभागाने ऑक्टोबरसाठी इशारा देताना सांगितले की, या महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील, तर किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. परतीच्या मान्सूनला उशीर झाल्याने राज्यात पावसाचा मुक्काम कायम असून, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना यामुळे अजून काही दिवस अस्वस्थ हवामानाचा सामना करावा लागू शकतो.