उमरखेड संघाचे पथसंचलन व शस्त्रपूजन उद्या

    दिनांक :03-Oct-2025
Total Views |
उमरखेड, 
हिंदू समाजामध्ये पौरुषत्व आणि शक्तीची जागृती श्री विजयादशमीच्या पवित्र प्रसंगी होते. Umarkheed Rss राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सुरू होऊन त्यास १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जागतिक शांती आणि मानवी कल्याणाच्या उद्देशाने शतकानुशतके सुरू असलेल्या प्रवासाचा हा कळस यावर्षी संघाचे पथसंचलन व शस्त्रपूजन कार्यक्रम रविवार, ५ ऑक्टोबर रोजी स्थानिक नगर पालिका प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
 
 
Bhagava
 
Umarkheed Rss या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक लांडगे उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते विदर्भ प्रांत गोसेवा संयोजक विवेक बिडवई असणार आहेत. पथसंचलन संध्याकाळी ५ वाजता नपा प्रांगणातून सुवर्णपथ मार्गाने होणार तर मार्गदर्शनाचा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता नपा प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगर कार्यवाह यांनी केले आहे.