धडाकेबाज! मुनव्वर फारुकी नव्या भूमिकेत दिसणार

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
मुंबई,
Munawar Faruqui प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि ‘बिग बॉस 17’चा विजेता मुनव्वर फारुकी आता आपल्या अभिनयानेही प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाला आहे. त्याची लोकप्रिय वेब सिरीज ‘फर्स्ट कॉपी’च्या पहिल्या भागानंतर आता दुसऱ्या सीझनचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या छोट्या झलकाने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून सोशल मीडियावर फारुकीच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे.
 

Munawar Faruqui 
मुनव्वर फारुकीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून ‘फर्स्ट कॉपी 2’चा टीझर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या सीझनमध्ये बॉलीवूडमधील दोन दिग्गज कलाकार – गुलशन ग्रोवर आणि रजा मुरादही झळकणार आहेत. हे दोघे आपल्या काळातील खलनायकांच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. टीझर शेअर करताना मुनव्वरने लिहिले आहे, “वापसी तो अब होगी. आरिफ एक नए अध्याय के साथ वापस आ गया है.”
३६ सेकंदांच्या Munawar Faruqui  या टीझरमध्ये रजा मुरादचा प्रभावी संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. तो मुनव्वरच्या पात्राला म्हणतो, “देखो आरिफ, आसमान तो बहुत बड़ा है, लेकिन जहां तुम उड़ना चाहते हो उसकी कीमत लगती है.” त्यावर मुनव्वर उत्तर देतो, “वहां का टिकट कटा रहा हूं, जहां सारे बेईमान लोग रहते हैं.” त्यावर रजा म्हणतो, “लेकिन जिस जहन्नुम में तुम जा रहे हो, वहां का शैतान बहुत बड़ा है.” टीझरच्या अखेरीस ‘आरिफ’ला बॉलीवूडचा नवा ‘किंग’ म्हणून दाखवले गेले आहे. टीझरमध्येच सिरीजच्या ट्रेलरच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. ‘फर्स्ट कॉपीच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर २९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सिरीज १९९० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील पायरसीच्या काळावर आधारित आहे. या सीझनमध्ये मुनव्वर फारुकीसोबत क्रिस्टल डिसूजा, आशी सिंग, शाकिब अयूब, मियांग चेंग आणि नवाब शाह हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
कॉमेडीच्या मंचावरून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारा मुनव्वर फारुकी आता अभिनयाच्या क्षेत्रातही स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘फर्स्ट कॉपी 2’चा टीझर पाहून असे वाटते की या वेब सिरीजच्या नव्या अध्यायात प्रेक्षकांना थरार, नाट्य आणि भावनांचा संगम पाहायला मिळणार आहे.