अफगाणिस्तानने भारताला सोपवला बग्राम हवाई तळ!

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
afghanistan-bagram-air-base-to-india ताजिकिस्तानमधील भारताचा एअरबेस बंद करावा लागला असून, या निर्णयामागे तुर्की, कतार आणि पाकिस्तानचा दबाव असल्याची चर्चा आहे. या घडामोडीनंतर सोशल मीडियावर अफवा पसरली आहे की अफगाणिस्तानातील तालिबानने भारताला बग्राम एअरबेस वापरण्यासाठी दिला आहे.

afghanistan-bagram-air-base-to-india 
 
हीच ती बग्राम एअरबेस, जिथे एकेकाळी अमेरिकन सैन्य तैनात होते. afghanistan-bagram-air-base-to-india अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही काही महिन्यांपूर्वी हा बेस पुन्हा मिळवण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र तालिबानने त्याला ठाम विरोध दर्शवला होता. आता सोशल मीडियावर दावा केला जातोय की तालिबानने हा बेस भारताला दिला आहे.
एका सोशल मीडिया युजरने लिहिले आहे की, “अफगाणांनी भारताला बग्राम एअरबेस देऊन टाकला आहे. afghanistan-bagram-air-base-to-india भारतीय तांत्रिक टीमने त्या ठिकाणी जाऊन सर्व पाहणी पूर्ण केली असून, बेस पुन्हा कार्यान्वित करण्याचे काम सुरू झाले आहे.” त्याचबरोबर त्याने असा दावा केला की पाकिस्तानने कतार आणि सौदी अरेबियाच्या माध्यमातून ताजिकिस्तानवर दबाव टाकला आणि भारताला एअरबेस रिकामा करावा लागला.
दुसरीकडे काही युजर्स म्हणतात की भारत ताजिकिस्तानला त्या बेसच्या वापरासाठी मोठी आर्थिक मदत देत होता, पण पाकिस्तान, तुर्की, सौदी आणि कतारच्या दबावामुळे ताजिकिस्तानला भारतासोबतचा करार संपवावा लागला. afghanistan-bagram-air-base-to-india या परिस्थितीत, तालिबानने भारताला बग्राम बेस वापरण्याची परवानगी दिली असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. एका युजरने व्यंगात्मक शैलीत लिहिले, “पाकिस्तानला वाटले होते की ताजिकिस्तानवर दबाव टाकून त्यांनी भारताला हरवले, पण तालिबानने भारताला बगराम एअरबेस देताच पाकिस्तानचे सारे डाव उलटे पडले.
‘ग्रोक’च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, भारताने अलीकडे ताजिकिस्तानमधील आयनी एअरबेस रिकामा केला, कारण अफगाणिस्तान सरकारने भारतीय संपत्ती परत घेण्याची विनंती केली होती. हा निर्णय भू-राजकीय दबावांमुळे घेतला गेला असल्याचे सांगितले जाते, ज्यात पाकिस्तान आणि कतारचा प्रभाव असल्याचेही नमूद केले आहे. तथापि, तालिबानने भारताला बग्राम एअरबेस हस्तांतरित केल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही. afghanistan-bagram-air-base-to-india तालिबानच्या कोणत्याही निवेदनात अशा प्रकारचे उल्लेख आढळलेले नाहीत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ही फक्त अपुष्ट चर्चांवर आधारित अफवा आहे, ज्यामध्ये वास्तवाचा आधार नाही.