आलिशान हॉटेल, बर्थडे आणि नग्न पडलेली मुलगी...

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
आग्रा,
Agra luxury hotel news आग्रा शहरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शास्त्रीपुरममधील आर.व्ही. लोधी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हॉटेल द हेवन मधून एक तरुणी अचानक रस्त्यावर कोसळली आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ती पूर्णपणे नग्न अवस्थेत होती. ही घटना हॉटेलखालील रस्त्यावर वाहतूक सुरू असतानाच अचानक वरून पडलेल्या मुलीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुलीला चादरीने झाकून तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सांगितले की मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Agra luxury hotel news 
या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित हॉटेलची खोली तपासली असता खोली क्रमांक ४ मध्ये वाढदिवसाच्या सजावटीचे पुरावे सापडले. खोलीत फुगे, रंगीबेरंगी रिबन आणि भिंतीवर “हॅपी बर्थडे” असा संदेश लिहिलेला दिसला. मात्र, खोलीचा संपूर्ण परिसर अस्ताव्यस्त अवस्थेत होता. त्यामुळे प्राथमिक तपासात पोलिसांना असा संशय आहे की, ती मुलगी आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती आणि त्याच दरम्यान काहीतरी वाद किंवा अपघात झाला असावा.
 
तपासादरम्यान पोलिसांना समजले की घटनेनंतर मुलीचा मित्र आणि हॉटेलमधील काही कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. यानंतर पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक (हरी पर्वत) संजय महाडिक यांनी सांगितले की, “घटनेचा सखोल तपास सुरू आहे. जखमी मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब घेतला जाईल. तसेच हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि आसपासच्या परिसरातील कॅमेरे तपासले जात आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण आग्रेमध्ये खळबळ उडाली असून, दिवसाढवळ्या हॉटेलमधून नग्न अवस्थेत मुलगी पडल्याने पोलिस यंत्रणेला अलर्ट करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीच्या आधारे या प्रकरणामागचे नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींचे सत्य लवकरच समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.