तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Ajit Pawar राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. पण हे सरकार शेतकèयांसाठी जराही निधी कमी पडू देणार नाही, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते गुरुवार, 30 ऑक्टोबरला येथील पोस्टल मैदानावर आयोजित अप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार अमोल मिटकरी, बाळासाहेब कामारकर, वसंत घुईखेडकर, क्रांती राऊत, लाला राऊत, अरुण राऊत, नाना गाडबैले, विवेक देशमुख, भाई अमन, सुनयना येवतकर, बाळा दरणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, सध्या शेतकèयांवर संकट आले आहे. या संकटात आपले सरकार शेतकèयांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकèयांना नुकसान भरपाई मिळाली असून, इतर शेतकèयांना पण लवकरच भरपाई मिळणार आहे.
माझे यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलणे झाले आहे. काही अडचणी असले तर ते कळवा मी सोमवारपर्यंत त्यातून मार्ग काढतो, असे मी जिल्हाधिकाèयांना सांगितले आहे. राज्य सरकार शेतकèयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही ते म्हणाले.त्याचबरोबर आपल्या सरकारने विविध योजना आणल्या आहेत. यात लाडकी बहीण, दिव्यांग बांधवांसाठी तसेच इतर अनेक योजनांचा समावेश आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या योजना हे सरकार पोहोचवणार आहे, असे पवार म्हणाले. यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. होऊ घातलेल्या निवडणुकीत जिल्ह्यात जास्त-जास्त जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत, यासाठी काम करा, असे यावेळी कार्यकर्त्यांना बजावून, पाऊस सुरू असतानासुद्धा तुम्ही या मेळाव्याला आले आहात, मी तुमचं मनापासून स्वागत करतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.