दिलजीत दोसांझवर ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी टीका!

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
सिडनी,
Australia on Diljit Dosanjh सुप्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या नवीन अल्बम ‘ऑरा’ च्या जागतिक प्रमोशनल दौऱ्यावर आहे. परंतु या दौऱ्यादरम्यान त्याला एक धक्कादायक अनुभव आला आहे. ऑस्ट्रेलियात आगमन झाल्यानंतर विमानतळावर दिलजीतला काही लोकांकडून वर्णद्वेषी टिप्पण्यांचा सामना करावा लागला. काहींनी तर सोशल मीडियावर त्याला “कॅब ड्रायव्हर” किंवा “उबर ड्रायव्हर” अशी उपमा दिली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये संताप आणि दुःखाची लाट उसळली आहे.
 

Australia on Diljit Dosanjh 
संग्रहित फोटो 
दिलजीतने स्वतः याबाबत एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, “जेव्हा मी ऑस्ट्रेलियात पोहोचलो तेव्हा पापाराझींनी फोटो काढले. नंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि काही लोकांनी कमेंट केली ‘नवीन उबर ड्रायव्हर आला आहे’, ‘७-इलेव्हनचा नवीन स्टाफ मेंबर आहे’. दिलजीत म्हणाला की अशा टिप्पण्या पाहून तो काही क्षण स्तब्ध झाला, पण राग न करता त्याने या प्रसंगाकडे सकारात्मकतेने पाहायचे ठरवले.