नोव्हेंबरमध्ये बँका १३ दिवस बंद! RBIची सुट्ट्यांची यादी जाहीर

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Bank Holidays in November : नोव्हेंबरमध्ये बँका तब्बल १३ दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने राष्ट्रीय, प्रादेशिक आणि साप्ताहिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या सुट्ट्या सर्व राज्यांत एकसारख्या नसून स्थानिक सण-परंपरेनुसार लागू होतील. दिलासा म्हणजे नेट बँकिंग, UPI, मोबाइल अ‍ॅप आणि ATM सेवा सुरू राहतील.
 
 
BANK
 
 
 
सुट्ट्यांचा तपशील:
 
१ नोव्हेंबर: कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये कन्नड राज्योत्सव आणि इगस-बागवाल निमित्त सुट्टी.
५ नोव्हेंबर: गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा निमित्त अनेक राज्यांत बँका बंद.
६-७ नोव्हेंबर: मेघालयमध्ये नोंगक्रेम आणि वंगाला महोत्सवमुळे सुट्टी.
८ नोव्हेंबर: कर्नाटकात कनकदास जयंती.
 
याशिवाय, २, ८, ९, १६, २२, २३ आणि ३० नोव्हेंबर हे शनिवार-रविवार सुट्ट्यांमध्ये समाविष्ट आहेत.
 
 
एकूणच, नोव्हेंबर महिन्यात बँका १३ दिवस बंद राहतील. त्यामुळे ग्राहकांनी व्यवहार आणि बँक कामे वेळेवर पूर्ण करण्याचे नियोजन करावे.