मानोरा,
accident-manora : तालुक्यातील गिर्डा गावाचे मूळ निवासी आणि रोजगारा निमित्त मुंबईला वास्तव्याला असलेले दाम्पत्य दिवाळी सण आटोपून दुचाकीने व मुंबईकडे जात असताना वाशीम मालेगाव रस्त्यावर समोरून आलेल्या दुचाकी सोबत झालेल्या धडकीत ठार झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
सदाशिव रामदास राठोड (वय ४५ ) त्यांची पत्नी सरला राठोड (वय ४०) हे दिवाळी सणानिमित्त आपले गाव गिर्डा येथे मागील आठवड्यात आले होते. सदाशिव राठोड हे मुंबईला येथे वाहन चालक म्हणून काम करीत असल्याने त्यांचे कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून मुंबईलाच राहायला होते . दिवाळीनिमित्त गावाकडे येताना रेल्वे आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची तिकीट मिळणे अवघड असल्याने व खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या लझरी गाड्यांचे सुद्धा तिकीट दर परवडणारे नसल्याने हे दांपत्य आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच. ३७ एएन ५४७९) गावाकडे यावेळी आले होते.
दिवाळी सण आटोपून आपल्या दुचाकीने मुंबईकडचा परतीचा प्रवास करताना आज, ३० ऑटोब र शेलुबाजार मालेगाव मार्गावरील जवूळका रेल्वे या गावा नजीक चुकीच्या मार्गाने दुचाकी घेऊन आलेल्या कृष्णा नर्सिंग भोकरे रा.सावरखेड ता. मालेगाव वय २३ दुचाकी क्र. एमएच ३० पिजे ५४४५ सोबत समोरासमोर भीषण धडक झाल्याने गिर्डा येथील हे दांपत्य जागीच ठार झाले.
सावरखेड येथील कृष्णा भोकरे हा दुचाकी स्वार सुद्धा उपचारादरम्यान मयत झाल्याने या अपघातात दुचाकी वरील मृतांची संख्या तीन एवढी झाली असून, भोकरे यांच्या समवेत असलेला दुचाकी वरील स्वार गंभीर जखमी असून त्याचे उपचार सुरू असल्याचे माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला देण्यात आली.
छायाचित्र - मयत सदाशिव राठोड, सरला राठोड