सेवाभाव आणि भक्तीभाव जोपासणं हेच समाजहिताच खर साधन आहे: राधेश्याम चांडक

शासकीय रुग्णालयात ६०० वा अन्नदान सप्ताह

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
बुलढाणा,
food donation week बुलढाणा शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना १३ वर्ष सातत्याने अन्नदान उत्फुर्तपणे केल्या जात आहे हा स्तुत्य उपक्रम आहे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सर्व सेवेकरी सेवा देत आहेत. हा त्रास कमी व्हावा म्हणुन रु. ५०.०० लक्षचा हॉल बांधुन देण्याची घोषण आ. संजय गायकवाड यांनी केली होती व त्याचे कामही सुरु आहे. सेवाभाव आणि भक्तीभाव जोपासणे हेच समाजहिताच खर साधन आहे असे गौरवउद्गार सदभावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी काढले.
 
 
 
भक्ती
 
 
 
२०१२ पासुन शासकीय रुग्णालयातील भरती असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांसाठी दर गुरुवारी अन्नदान वितरीत करण्यात येत आहे. प्रत्येक गुरुवारी ४०० ते ५०० गरजु महाप्रसाद प्राप्त करतात. या निमित्त बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि आ. संजय गायकवाड यांनी संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करून महाप्रसादाचे वितरण केले. सर्व सेवेकर्‍यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी विजय अंभोरे, ओमसिंग राजपूत, जिजाबाई राठोड, माहेश्वरी युवा मंचचे सदस्य उपस्थित होते, अन्नदान सेवा समितीचे सर्व सेवेकर्‍यांचा सत्कार गोपालसिंग राजपूत, सुरेश गट्टाणी, विजय वैद्य, संदिप बिलारी, रुपराव उज्जैनकर, तिलोकचंद चांडक, प्रा. प्रकाश पाठक व सौ. वाणी, पांडुरंग कराडे, प्रविण सावजी, लक्ष्मण सांगळे महाराज, नंदु बोर्डे, राहुल रायपुरे, संजय चोपडे, रमेश काळे, मख वराडे, चव्हाण, बजरंग सोनी, सुडके, वावगे, नागरे, मुन्हेकर, गजानन वैद्य, धनंजय चाफेकर, अली, सय्यद, गजेंद्रसिंग राजपूत, फिसके, शामराव खरे, जिवन कांबळे, कॅटरर्स अशोक पांचाळ, पाणी व्यवस्था करणारे मनोज राजुरे इत्यादींचा समावेश होता.food donation week अन्नदान व्यतिरिक्त गरजुंना कपडे वाटप करण्यात येते.
६०० व्या गुरुवारचे अन्नदाते होते ईश्वरदासजी पुनमचंदजी चांडक अकोला यांना हे सौभाग्य प्राप्त झाले. अन्नदान वितरणाच्या प्रारंभी सेवेकर्‍यां तर्फे राधेश्याम चांडक आणि आ. संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनुजा सरकटे उपस्थित होत्या, संत गजाननमहाराजांच्या कृपेने सेवाभाव आणि भक्तीभाव जोपासणं हेच समाजहिताच खर साधन आहे भक्तीमय परिसर झाला होता.