पहिला सेक्स ते खूनापर्यंतचा प्रवास...रामकेशचा शेवट

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Delhi Ramkesh News दिल्ली हादरवून टाकणाऱ्या एका प्रेम, फसवणूक आणि खुनाच्या कथेनं संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. मुरादाबादची २१ वर्षीय अमृता चौहान आणि दिल्लीतील ३२ वर्षीय आयएएस व्हायची स्वप्नं पाहणारा रामकेश मीना यांच्या नात्याची, जे प्रेमापासून लिव्ह-इन रिलेशनशिपपर्यंत गेले आणि शेवटी खुनावर संपले. अमृता चौहान, फॉरेन्सिक सायन्समध्ये पदवीधर आणि बुद्धिमान विद्यार्थिनी, तिच्या मोहक पण गुंतागुंतीच्या स्वभावामुळे चर्चेत होती. मुरादाबादमध्ये राहणाऱ्या अमृताने आपल्या पहिल्या प्रियकर सुमित कश्यपसोबतचे नाते तोडून नोएडामध्ये नोकरीच्या शोधात गेलेल्या काळात रामकेश मीनाला भेटली. दोघांची पहिली भेट एका नोकरीच्या मुलाखतीदरम्यान झाली आणि त्या दिवसानंतर त्यांचं नातं झपाट्याने फुललं.
 
 
 
Delhi Ramkesh News
लवकरच अमृता आणि रामकेश तिमारपूर येथील एका फ्लॅटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दोघांमधील जवळीक वाढली आणि त्यांनी अनेक खाजगी क्षण कॅमेऱ्यात कैद केले. पण या जवळिकीनेच त्यांच्या आयुष्यात वादळ आणले. काही महिन्यांतच नातं ढासळू लागलं, कारण अमृताचा पुन्हा तिच्या जुन्या प्रियकर सुमितशी संपर्क झाला होता. ती रामकेशपासून दूर जात असल्याचं पाहून रामकेश संतापला आणि अमृतावर दबाव आणू लागला. रामकेशने अमृताला धमकी दिली की तिचे खाजगी व्हिडिओ तो सोशल मीडियावर लीक करेल जर ती त्याला सोडून गेली तर. हे टाळण्यासाठी अमृताने एक भयंकर योजना आखली. तिने सुमित आणि त्याचा मित्र संदीप यांच्याशी संपर्क साधला आणि रामकेशकडून ती हार्ड डिस्क मिळवायचा कट रचला. ६ ऑक्टोबरच्या रात्री, सुमित आणि संदीप मास्क घालून रामकेशच्या फ्लॅटवर पोहोचले. पोलिस तपासात उघड झालं की अमृता आधीच फ्लॅटमध्ये होती आणि लैंगिक संबंधांच्या बहाण्याने तिने रामकेशचे हातपाय बांधले होते. त्यानंतर तिघांनी मिळून त्याचा गळा दाबून निर्दयीपणे खून केला.
 
खूनानंतर त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी रामकेशच्या अंगावर तेल, तूप आणि दारू ओतली, आणि एलपीजी सिलेंडर लिक करून स्फोट घडवून आणला, जेणेकरून मृत्यू अपघातासारखा दिसावा. परंतु दिल्ली पोलिसांच्या तपासाने सर्व रहस्य उकललं. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन तपासल्यावर अमृताच या कटाची सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं. अमृताला मुरादाबादहून अटक करण्यात आली असून, चौकशीत तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. तिने कबूल केलं की, ती रामकेशपासून सुटून पुन्हा सुमितसोबत राहू इच्छित होती, आणि त्यासाठी हा कट रचला. या थरारक प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांनी अमृता, सुमित आणि संदीप यांच्याविरुद्ध खून, पुरावे नष्ट करणे आणि कटकारस्थानाचे गुन्हे नोंदवले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, नात्यांमधील आसक्ती, अविश्वास आणि सूड किती भीषण रूप घेऊ शकतो.