वाशीम,
gor banjara community गोर बंजारा समाजाला एस टी.दर्जाचे आरक्षण मिळावे, हैदराबाद गॅझेट लागू करुन सेवा सवलती उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागणीसाठी गोर बंजारा महाराष्ट्रभरातून समृद्धी महामार्गावर उतरुन सतगरु सेवालाल अन् याडी मरियामाला भोग लावून बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने ३० आटोंबर गुरुवार रोजी मालेगाव पाईंट जवळ समृद्धी महामार्ग व हैदराबाद अकोला राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वाशीम जिल्हा सह अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली जिल्ह्यातील किमान पाच हजारावर आंदोलकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
पोहरागडचे महंत कबीरदास महाराज यांनी विंती आरदास बोलून प्रा संदेश चव्हाण, महंत संजय महाराज, जानू महाराज, प्रा. डॉ अनिल राठोडसह हजारो गोर बंजारा आंदोलकांनी यात सहभाग घेतला. सुरुवातीला पोलिस प्रशासनाने संदेश चव्हाण यांना वारंगी फाट्यावर जवळपास दोन तास अडवून ठेवले. तेव्हा, खवळून पोलिस बंदोबस्ताचे कठडे तोडून धाव घेतली. तेव्हा संदेश चव्हाण आणि आंदोलकांनी थेट समृद्धी महामार्ग गाठले व तिथे आंदोलन केले. हैदराबाद अकोला महामार्गावर थांबलेले आंदोलक काही वेळातेच समृद्धी महामार्गावर एकवटला. व जवळपास एक तास ठिय्या मांडून आंदोलन केले.यावेळी समृद्धी महामार्गावर पोहरागडचे महंत कबीरदास महाराज यांनी संबोधित केले.नंतर नामा बंजारा, राजू रत्ने, अनिल चव्हाण, कांतीलाल नायक प्रा डॉ अनिल राठोड, प्रा संदेश चव्हाण यांनी संबोधित केले.
संदेश चव्हाण यांनी प्रशासनाने गोर बंजारा समाजाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, महिनाभरात पंचावन्न महामोर्चे काढून शासन दखल घेत नाही म्हणून आम्हाला समृद्धी महामार्ग बंद पाडावे लागले. भविष्यात गोर बंजारा समाजाला हक्काचे एस. टी. आरक्षण साठी केंद्राकडे शिफारस न केल्यास रेल रोको,पोहरागड येथे साखळी उपोषण आमरण उपोषण करु आणि हिवाळी अधिवेशन नागपूरला लाखो गोरबंजारा उतरवू असा इशारा दिला.gor banjara community आतापर्यंत लाखोंच्या संख्येने पंचावन्न महामोर्चा, गोर बंजारा युवकांनी ९ ठिकाणी आमरण उपोषण केले तसेच चार युवकांनी आरक्षणाची मागणी करीत आपले जीवन संपविले. मात्र सरकार गोर बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला गांभीर्याने घेत नसेल तर राज्य सरकारला यांची किंमत चुकवावी लागेल असा गर्भीत इशारा दिला.