आरोग्य विमा दावा नामंजूर करणे चुकीचे

- आयोगाचा बजाज आलियांजला फटका

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
नागपूर, 
health insurance claim बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स कंपनीने आरोग्य विमा दावा सरसकट नाकारण्याचा घेतलेला निर्णय अवैध असल्याचे मत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच कंपनीला तक्रारकर्त्यास ३५ हजार ७५१ रुपये ९ टक्के व्याजासह देण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. ही कारवाई शांतीनगर येथील रहिवासी संजय तोटेवार यांच्या तक्रारीवर करण्यात आली.
 
 

इन्शुरन्स  
 
 
आयोगाचे अध्यक्ष सचिन शिंपी आणि सदस्य बाळकृष्ण चौधरी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तोटेवार यांनी ३० ऑक्टोबर २०२२ ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीसाठी बजाज आलियांजची आरोग्य विमा पॉलिसी घेतली होती, ज्यात ५ लाख रुपयांचे संरक्षण होते. दरम्यान, त्यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार झाले आणि त्यांनी ३९ हजार ५६८ रुपयांचा दावा कंपनीकडे सादर केला. परंतु, कागदपत्रांची पूर्तता झाली नाही या कारणावरून विमा कंपनीने दावा नाकारला. त्यानंतर तोटेवार यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली.health insurance claim सुनावणीनंतर आयोगाने कंपनीचा निर्णय अन्याय्य आणि अवैध ठरवत तक्रारकर्त्याला आर्थिक दिलासा देण्याचा आदेश दिला. ग्राहकांच्या हक्कांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला असून, विमा कंपन्यांनी दावे नामंजूर करताना पारदर्शकता पाळावी, असा संदेश आयोगाने दिला आहे.