भंडारा,
phaltan-female-doctor-suicide-case फलटण येथील महिला डॉक्टराच्या आत्महत्या प्रकरणात कोणतीही हायगय न करता सखोल चौकशी करावी. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रामाणिकपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, या मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

महाराष्ट्राला विचार करण्यास भाग पाडणारी अशी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टराची आत्महत्येची घटना आहे. पोलीस अधिकारी गोपाल बदने आणि अन्य प्रशांत बनकर या दोघांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर महिला डॉक्टरांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत याची नोंद आहे. वैद्यकीय क्षेत्रातील महिलांच्या असुरक्षित वातावरणाची साक्ष देणारे आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही हायगय न करता प्रकरणाचा सखोल आणि सर्व बाजूंनी तपास करावा, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. घटना होण्यापूर्वीच महिला डॉक्टरने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पीडित डॉक्टरला जीव गमवावा लागला. phaltan-female-doctor-suicide-case त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाई व्हावी. कारवाई न झाल्यास महिला काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल, असेही निवेदना स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदन देताना महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, धनराज साठवणे, जिया पटेल, तुझ्या बाभरे, प्रियंका पडोळे, स्मिता मरगडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.