घरकुल लाभार्थ्यांना वाळु देण्यात खनिकर्म विभाग अपयशी
मागणी १ लाख ६० हजार ब्रासची, प्राप्त केवळ ४३७ ब्रास:अवैध वाहतूक जोरात
दिनांक :30-Oct-2025
Total Views |
अकाेला,
mining-department-akola शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय शासनाचा आहे.यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेकडून मार्च मध्ये महसूल विभागाकडे १ लाख ६० हजार ब्रासची मागणी शासनाकडे केली होती.तेव्हापासून केवळ ४३७ ब्रास वाळू उपलब्ध झाली असल्याने मोफत वाळू देण्याचे नियोजन करण्यात खनिकर्म विभाग अपयशी झाल्याचे दिसून येते.
घरकुल याेजेनअंतर्गत स्वामित्वधन न आकारता कमाल पाच ब्रासपर्यंत वाळू उपलब्ध करुन देण्यात यावी,असा आदेश शासनाने जारी केला आहे.त्यानुसार ग्रामीण विकास यंत्रणे कडून वाळू मागणीचा प्रस्ताव खणीकर्म विभागाला जून महिन्यात सादर करण्यात आला. मात्र जिल्ह्यातील वाळू घाटाचा लिलाव रखडल्याने वाळू उपलब्ध करून देण्याबाबत अडचणी येत होत्या. mining-department-akola दरम्यान तीस सप्टेंबर नंतर वाळू उत्खनन सुरू झाले आहे. मात्र एक महिना झाला असताना देखील घरकुल लाभार्थींना वाळू उपलब्ध करून देण्यात खनिकर्म विभाग कानाडोळा करीत असल्याची वस्तुस्थिती आहे.