आमदारपुत्राकडून उमेदवाराचे अपहरण आणि जबर मारहाण

    दिनांक :30-Oct-2025
Total Views |
कैथल,
candidate-assaults-kidnapping : हरियाणातील कैथल जिल्ह्यात सरपंच निवडणुकीच्या वादातून अपहरण आणि मारहाणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिचरवली गावातील गुरचरण उर्फ काला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी काही अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत आणि लोखंडी रॉडने धमकावत खारकन गावातून त्याचे अपहरण केले. हल्लेखोरांनी त्याच्यावर गंभीर मारहाण केली, ज्यात त्याचा पाय तुटला.
 
 
J
 
 
 
गुरचरणचा आरोप आहे की, कारमध्ये बंदिवान असताना पंजाबच्या शुत्राणा येथील आमदार कुलवंत बाजीगर यांच्या मुलाने व्हिडिओ कॉलद्वारे त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मागील सरपंच निवडणुकीतील वादाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
 
गुहलाचे डीएसपी कुलदीप बेनिवाल यांनी सांगितले की, अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी सखोल तपास हाती घेतला आहे.